खवय्यांसाठी मेजवानी : पोपटी सोबतच ‘कौल चिकन’ ला रायगड मध्ये आहे प्रचंड मागणी ; एकदा आस्वाद घेऊन तर पाहा

हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात पोपटीची लगबग आहे त्यासोबतच लॉकडाऊन मुळे बरीचशी मंडळी अजून तरी कोकणात आपल्या घरीच आहेत अनेक खवय्ये पोपटी सोबत साईड डिश म्हणून कौल चिकनला पसंती देतात.

    रायगड : रायगड मध्ये माळरान आणि लाकूड फाटा मुबलक प्रमाणात असल्यामुळे व अतिशय कमी इंग्रिडियंट वापरून झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून कौल चिकन प्रचलित होत आहे. कमी खर्चात व व साध्या पद्धतीने तयार करण्यात आलेले कौल चिकन खवय्यांसाठी उत्तम मेजवानी आहे.

    हिवाळ्यातील थंडीचा कडाका वाढत असताना खवय्यांची पोपटी सोबत कौल चिकनला सुद्धा तेवढीच मागणी आहे. रायगड मधील तरुण मंडळी पार्टीला सध्या कौल चिकनला तेवढीच पसंती देत आहेत. हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात पोपटीची लगबग आहे त्यासोबतच लॉकडाऊन मुळे बरीचशी मंडळी अजून तरी कोकणात आपल्या घरीच आहेत अनेक खवय्ये पोपटी सोबत साईड डिश म्हणून कौल चिकनला पसंती देतात.

    घराच्या अंगणात किंवा रानात जाऊन दगडाचा चुल्हा मांडून त्यावर कौल ठेवून गरम झालेल्या कौलावर चिकन चांगले भाजून घेतले जाते व हेच भाजून घेतलेले चिकन म्हणजेच ‘कौल चिकन’ स्थानिक लोकांना व खास करून मुंबईकरांना कौल चिकनची फार क्रेझ आहे. व अल्पावधीत हि संकल्पना सर्वश्रुत होत आहे.

    कौल चिकनची पद्धत :

    पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरीनेट केले जाते व त्यामध्ये तिखट, हळद, लिंम्बू, तेल, मीठ यांचं मिश्रण करून मॅरीनेट होण्यासाठी त्याला एक दीड तास तसेच ठेवले जाते. त्यानंतर कौल स्वच्छ करून दगडाची चूल मांडली जाते त्यावर खाद्यतेल टाकून चिकनला भाजून घ्यावे. कौलाच्या गरम आचेवर तयार झालेले मॅरीनेट चिकन खरपूस भाजून घ्या, सर्व बाजूनी चिकन भाजले जाईल याची मात्र काळजी घ्यायला विसरू नका, खरपूस चिकन भाजून झाल्यावर त्यावर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर लावून चिकन चाखून बघा आणि कौल चिकन चा आस्वाद घ्या.