प्राणीही घेतात घटस्फोट; वाचून आश्चर्य वाटेल!

युरोपातील एमएनएन नामक संस्थेच्या आकडेवारीनुसार, ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्राणी एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत राहतात आणि त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवतात. अनेक प्रजातींचे प्राणी प्रदीर्घ काळपर्यंत एकाच जोडीदारासोबत राहत नाही.

प्राणी घटस्फोट घेतात याआधी ते लग्न करतात का असे वाचकांना वाटत असेल. कारण लग्न, संसार व घटस्फोट या मानवी जीवनातील महत्त्वाच्या घटना आहेत. त्यामुळे प्राण्यांचेही जीवन मानवाप्रमाणेच असते का याचा शोध घेणे आवश्यक ठरेल. खरेतर बहुतांश प्राणी मिश्र समूहांमध्ये राहतात, त्यांच्यातील काही मोजक्याच प्रजाती आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत व्यतीत रतात.

युरोपातील एमएनएन नामक संस्थेच्या आकडेवारीनुसार, ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्राणी एकापेक्षा जास्त जोडीदारांसोबत राहतात आणि त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवतात. अनेक प्रजातींचे प्राणी प्रदीर्घ काळपर्यंत एकाच जोडीदारासोबत राहत नाही. काळासोबत ते आपला सोबती बदलतात. बऱ्याच प्राण्यांबाबत नेहमीच असे सांगितले व मानले जाते कीश् ते एकमेकांच्या संपर्कात येतात. काही दिवसांच्या सहवासानंतर पुन्हा विभक्त होतात. याबाबतीत मधमाशांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. मधाच्या पोळ्यातील राणी माशी १ ते ४० नरांसोबत संबंध ठेवते. त्यामुळेच तिच्या पोटी जन्मास येणाऱ्या मधमाशांमध्ये एवढे वैविध्य आढळून येते. मात्र काही प्राणी असेही आहेत, जे एकाच जोडीदारासोबत आयुष्य घालवितात. कोल्हा त्यापैकीच आहे. याशिवाय कासवेसुद्धा आयुष्यभर एकाच जोडीदारसोबत प्रामाणिक असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या फारकत घेऊन वेगळे होण्याच्या प्रवृत्तीबाबत ९० टक्के प्राण्यांमध्ये संबंध प्रस्थापित केल्यानंतर घटस्फोट होते, असे म्हटले जाऊ शकते.