bathing

प्रत्येक व्यक्तीला शरीर स्वच्छतेसाठी आंघोळ गरजेची असते. मात्र, आंघोळीवेळी तुमच्याकडून रोज अशा काही चुका होतात, त्यातून तुमच्या आरोग्यासोबतच सौंदर्यावरही परिणाम होतो. कारण आंघोळीच्या निमित्ताने जास्तवेळ पाण्यात राहिल्याने तुमच्या शरिरातील नॅचरल ऑईल्स नष्ट होऊन, त्याची त्वचा कोरडी बनते. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी आंघोळीवेळी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याविषयी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

  गरम पाणी

  अनेकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. कारण यातून त्यांच्या स्नायूंना आराम मिळतो असा समज असतो. पण अंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापराने त्यांच्या शरिरातील आवश्यक ऑईल नष्ट होतं. आंघोळीसाठी गरम पाण्याच्या वापरानं त्याची त्वचा ड्राय (कोरडी) बनते. त्यामुळे शरिराला खाज सुटते. त्यामुळे जर तुम्ही थंड हवामानाच्या परिसरात राहात असाल, तर आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

  शॉवरखाली जास्त वेळ

  जर तुम्ही अंघोळीच्या निमित्ताने 30 मिनिटाचा काळ पाण्यात घालवत असाल, तर ते तुमच्या त्वचेसाठी अपायकारक होऊ शकतं. कारण याने तुमच्या त्वचेचा ओलावा नष्ट होतो. तेव्हा जर तुम्ही शॉवरखाली अंघोळ करत असाल, तर जास्तीत जास्त 10 मिनिटांचाच अवधी आंघोळीसाठी वापरावा.

  सुगंधी साबण

  आंघोळीसाठी सुगंधी साबणाच्या वापरानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे आंघोळीसाठी एशेंशियल ऑईल युक्त साबण वापरल्यास त्वचेसाठी चांगले असते.

  आंघोळीचा ब्रश

  अंघोळीसाठी वापरण्यात येणारा ब्रश त्वचेसाठी चांगला असतो. पण तो अधिकच जुना झाला असल्यास वेळीच बदलावा. कारण, जुन्या ब्रशच्या वापरानं तुमच्या त्वचेला इजा पोहचू शकते. त्यामुळे जितके जुने बॉडी पफ किंवा ब्रश असेल, तितकाच शरिरावर किटाणू जमण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आंघोळीचा ब्रश एक महिन्यांच्या कालावधीनंतर बदलावा.याशिवाय आंघोळीच्यावेळी केस चांगल्याप्रकारे धुवावेत. तसेच अंघोळीदरम्यान तोंडावाटे साबण तोंडात गेला असल्यास गुळण्या कराव्यात.