benefits of vegen hair dye
benefits of vegen hair dye

पण केसांना डाय करण्यासाठी वापरण्यात येणारे हेअर कलर आणि डाय यामध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असते. याच्या वापराने केसांना हानी पोहोचते. याच कारणांमुळे सर्वसामान्या लोकं आता हेअर कलर आणि हेअर डायला पर्याय शोधू लागले आहेत.

    आपल्या केसांना डाय करण्याच्या फंदात फार कुणी पडत नाही खरं पाहता वाढतं वय, आपली बिघडत चाललेली जीवनशैली आणि चुकीचे डाय वापरल्याने काळाच्या ओघात केसांना अकाली वैधव्य येण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशीच काही कारणं आहेत, ज्यामुळे लोकं केसांना डाय करतात किंवा केसांची चांगली स्टाईल करता यावी म्हणूनही केसांना डाय करतात.

    पण केसांना डाय करण्यासाठी वापरण्यात येणारे हेअर कलर आणि डाय यामध्ये केमिकलचे प्रमाण अधिक असते. याच्या वापराने केसांना हानी पोहोचते. याच कारणांमुळे सर्वसामान्या लोकं आता हेअर कलर आणि हेअर डायला पर्याय शोधू लागले आहेत.

    असाच एक पर्याय शाकाहारी किंवा वीगन हेयर डाई (Vegan Hair Dye)चा देखील आहे. व्हेज हेअरडाय मध्ये अमोनिया किंवा अन्य हानिकारक पदार्थांचा उपयोग केला जात नाही. व्हेज हेअर डाय केसांना फक्त उत्तम रंगच नाही तर त्यांचे आरोग्यही चांगले राखण्यास सहाय्य करतो.

    जर तुम्हाला व्हेज हेअर डाय विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखात आम्ही आपल्याला व्हेज हेअर डाय लावल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. या लेखात सांगितलेले फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही तुमच्या केसांना हेल्दी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न कराल.

    व्हेज किंवा वीगन हेअर डाय म्हणजे काय? (What Are Vegan Hair Dyes?)

    व्हेज हेअर डाय वास्तविक पाहता केसांसाठी एक हर्बल ट्रिटमेंट आहे. ज्याचा वापर रसायनांशिवाय केसांना कलर करण्यासाठी करण्यात येतो. व्हेज हेअर डाय केसांना कोण्त्याही प्रकारचं नुकसान होऊ न देता त्यांना नैसर्गिकरित्या रंग प्राप्त व्हावा यासाठी गाजर किंवा बीट यासारख्या फळभाज्यांचा वापर करून तयार करण्यात येतात.

    हे नैसर्गिक हेअर डाय केस आणि डोक्यावरच्या त्वचेसाठी आरामदायी आणि हानिकारक नसतात. पण यांचा प्रभाव हा कायमस्वरुपी राहत नाही यासाठी त्यांना सातत्याने टचअपची आवश्यकता भासते.

    या नैसर्गिक हेअर डायवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार केलेले नसतात. याचा उपयोग मानवावर करण्याआधी प्राण्यांवरही करण्यात आलेला नसतो. याशिवाय यात कोणत्याही पशुपासून मिळणाऱ्या घटकांचा यात समावेश केलेला नसतो. हे डोक्यावरची त्वचा आणि त्यावर वापर करण्यासाठी नैसर्गिक आणि कैक पटींनी सुरक्षितही असतात.

    हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे की, व्हेजिटेबल हेअर डाय वीगन नसते. तर काही व्हेजिटेबल हेअर डाय उत्पादनांमध्ये डेअरी उत्पादनांचा वापर करण्यात आलेला असतो. वीगन प्रोडक्ट्स, ही डेअरी फ्री उत्पादने असतात(यात डेअरी उत्पादनांचा वापर केलेला नसतो.) आपण जर शुद्ध शाकाहारी असाल तर खरेदी करण्यापूर्वी त्या घटकांची यादी दोनदा-तपासून घ्या.

    व्हेज हेअर डाय वापरण्याचे फायदे (Benefits Of Using Vegetable Hair Dyes) :

    benefis of vegen hair dye
    benefis of vegen hair dye

     

    १. केसांचे आरोग्य सुधारते (Promote Hair Health)

    भाज्या जशा नैसर्गिकरित्या शुद्ध असतात. त्या तुमच्या केसांना कलर करण्याव्यतिरिक्तही आपल्या केसांना मजबूत करतात आणि डॅमेज केसांना रिपेयरही करतात. हे तत्व आपल्या केसांना नैसर्गिकदृष्ट्या मॉइश्चराइज्ड आणि पौष्टिक समृद्धी प्रदान करते.

    २. नुकसान होण्यापासून बचाव करते (Prevent Damage)

    सामान्य हेअरडाय मध्ये असलेली रसायने केसांसाठी हानिकारक असतात आणि केस तुटण्याला आणि गळण्याला कारणीभूत ठरतात. केस कमजोर आणि क्षुष्क होऊ शकतात. पण व्हेज हेअर डाय या बाबतीत असे नसतात ते हायड्रोजन पॅरॉक्साईड, पॅराबेन्स, अमोनिया, इत्यादी सारख्या रसायनांपासून केसांचे नुकसान होऊ देत नाहीत.

    ३. केसांची ठेवण यामुळे सुरक्षित राहते (Protect Hair Structure)

    साम्न्य हेअर डाय मध्ये असलेली रसायने केसांना आतून रंगविण्यासाठी क्युटिकल्समध्ये प्रवेश करतात. अशाप्रकारे, ते केसांची संरचना आणि ठेवण बिघडवू शकतात आणि यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक बळावते. व्हेज हेअर डाय केसांची ठेवण सुरक्षित ठेवतात आणि केसांची गळती कमी करतात.

    ४. केसांमधील ओलावा टिकून राहतो (Moisturize Hair)

    व्हेज हेअर डायमध्ये अशा तेलांचा वापर केलेला असतो ज्यामुळे केसांची वाढ नव्याने होते आणि त्यातील ओलावा टिकवून ठेवतो. ज्यावेळी तु्ही व्हेज हेअर डायचा वापर करता त्यावेळी केसांची गळती कमी झालेली असते. केसांची ठेवण आणि ते अधिक चमकदार तसेच मुलायमही दिसू लागतात.

    ५. त्वचा विकारांच्या समस्या संपुष्टात येतात (Treat Scalp Issues)

    कोरफडासारखे नैसर्गिक तत्वही खाज किंवा सोरायसिस सारख्या त्वचा विकारांवर उपयोगी ठरते. दुसरीकडे, नियमितपणे केसांचा रंग कायम राहून त्यांची वाढही होते.

    ६. हे कायमस्वरुपी नाही (Are Temporary)

    व्हेज हेअर डाय कायमस्वरुपी तसेच राहत नाहीत. यामुळे कोणताही धोका संभवत नाही. तुम्ही केसगळतीची चिंता न करताच काही भाज्या आणि वनस्पतींवर आधारित घटकांसोबत याचा वापर करू शकता.

    ७. ते त्वचेला हानिकारक नाहीत (Are Skin-Friendly)

    सामान्य हेअर डायमध्ये नट किंवा सोया या घटकांचा वापर केलेला असू शकतो याचे त्वचेवर दुष्परिणाम दिसू लागतात (जळजळ, लाल होणे, सूज येणे, खाज सुटणे) यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला जोपर्यंत एखाद्या विशिष्ट वनस्पतीची किंवा भाजीची अॅलर्जी होत नाही तोपर्यंत, अधिकाधिक व्हेज हेअर डाय त्वचेसाठी सुरक्षित असते आणि अॅलर्जी होण्याचे कारणच यामुळे उरत नाही.

    Benefits of vegen hair dye