Bhaubeej Muhurata and Katha : भाऊबीज मुहूर्त, जाणून घ्या औक्षणाचा शुभमुहूर्त कधीपासून कधीपर्यंत

भाऊबीजेला द्वितीया तिथीला बहिणीकडून टिळा लावण्याचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. यावर्षी भाऊ बीजेच्या दिवशी बहिणींकडून टिळा लावण्याचा (औक्षण करण्याचा) आणि बहिणींकडून भावाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त (Muhurata) दुपारी १.२६ ते ४:१० पर्यंत असेल. दुपारी १.२६ ते दुपारी २.४८ पर्यंतची वेळ ही सर्वोत्तम वेळ असेल.

    भाऊबीज (Bhaubeej) दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला साजरी केली जाते. द्वितीया तिथीला ही पूजा केली जाते म्हणून त्याचे नाव बीज आणि त्यात भावाची पूजा केली जाते, बहिणी भावाच्या कपाळावर आशीर्वादरुपी टिळा लावतात, म्हणून या दिवसाला भाऊबीज म्हणतात.

    भाऊबीजेला द्वितीया तिथीला बहिणीकडून टिळा लावण्याचे महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. यावर्षी भाऊ बीजेच्या दिवशी बहिणींकडून टिळा लावण्याचा (औक्षण करण्याचा) आणि बहिणींकडून भावाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त (Muhurata) दुपारी १.२६ ते ४:१० पर्यंत असेल. दुपारी १.२६ ते दुपारी २.४८ पर्यंतची वेळ ही सर्वोत्तम वेळ असेल.

    जर तुम्ही यावेळी टिळा लावण्याचा (औक्षणाचा) मुहूर्त (Muhurata) साधू शकत नसाल तर सकाळची वेळ ही आपल्यासाठी अधिक सोयीस्कर असल्यास अशा स्थितीत सकाळी ८ वाजल्यापासून ते ९ वाजून १९ मिनिटांदरम्यानच्या शुभमुहूर्तावर भाऊबीज साजरी करू शकता.

    Bhau Beej Story भाऊबीजेला टिळा लावण्याची परंपरा आणि लाभ

    भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडून टिळा लावण्याच्या मागे काय मान्यता आणि कथा आहे ही बाब अगदीच थोड्या लोकांना ठाऊक आहे. ही बाब अगदीच थोड्या लोकांना माहिती आहे की, दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. वास्तविक भाऊबीजेचा संबंधही दिवाळीशीच आहे.

    अशी कथा आहे की, द्वापारयुगात जेव्हा श्रीकृष्णाने नरक चतुर्थीला नरकासुराचा वध केला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिवाळीचा सण साजरा करण्यात आला होता. यानंतर श्रीकृष्ण कार्तिक कृष्ण द्वितीयेला आपल्या द्वारका नगरीत परतले होते. द्वारकेत परतल्यानंतर देवी सुभद्रेने आपला भाऊ श्रीकृष्णाची आरती केली होती आणि त्याला टिळा लावून आशीर्वाद दिले होते कारण नरकासुराच्या बंधनातून श्रीकृष्णाने हजारो मुलींना मुक्त केले होते. त्या दिवसापासूनच कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला बहिण भावाला टिळा लावते.

    एक आणखी आख्यायिका यमराज आणि यमुना नदीशी संबंधित आहे. या दिवशी बहीण यमुनेच्या घरी यमराज आले होते आणि यमुनाने वरदान म्हणून आपला भाऊ यमराजाकडून हे मागितलं होतं की, यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ बहिणीच्या हातचं भोजन करेल आणि बहिणींकडून टिळा लावेल त्यांना यमराज अकाली मृत्यूच्या भयातून मुक्त करतील. या दोन्ही मान्यतांमुळेच भाऊबीजेला टिळा लावण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे.