bodi community of africa kael ceremony is organised to findout fat man of the year

आफ्रिकेतील इथिओपियातल्या बोदी जमातीतले पुरुष अधिक जाडं होण्यासाठी ६ महिन्यांपासून तयारी करतात. कारण सर्वात जाड्या पुरुषालाच समाजातील 'हिरो' अशी मान्यता आहे.

इथिओपिया : आफ्रिकेत (Africa) एक ठिकाण असंही आहे की, या ठिकाणी पुरुष जाडे असणं हे शुभ लक्षण मानलं जातं. जो अधिक जाड असेल त्याला इनाम देऊन त्याचा सन्मान करण्यात येतो. हो हे खरंय. आम्ही आपल्याला इथिओपिया (Ethiopia) विषयी सांगत आहोत, या देशात अनेक आदिवासी जमाती आहेत.

यापैकीच एक आहे बोदी जमात (Bodi Community of Africa), या ठिकाणचे पुरुष ढोबळमानाने अवाढव्य असतात. अशा लोकांसाठी विशेष समारंभ आयोजित करण्यात येतो आणि यात सर्वात जाड्या व्यक्तीची निवड होते आणि त्यानंतर त्याला आयुष्यभर सन्मान आणि आवडत्या महिलेसोबत विवाह करण्याचे स्वातंत्र्य असते.

पुरुष अधिक वजनदार असण्याचं हे आहे कारण

बोदी समुदायातील पुरुष हे अधिकाधिक मधाचे सेवन करतात यामुळे त्यांचं वजन मोठ्या प्रमाणात वाढतं. या समुदायातील लोक आपल्या कमरेभोवती चारी बाजूंना कापसाची पट्टी बांधतात किंवा नग्नच फिरतात. ही जमात पूर्णपणे पशुपालन आणि गुरांवरच अवलंबून आहे. बोदी जमातीची आपली स्वतंत्र भाषा, संस्कृती आणि परंपरा आहे. बोदी लोकं अतिशय मनमिळावू आणि पाहुण्याचा मान-सन्मान करणारे म्हणून ओळखले जातात.

संपूर्ण जमातीचं जीवन आहे गायीवरच अवलंबून

१०,००० लोकसंख्या असलेल्या बोदी जमातीत मुलगा जन्माला आल्यास त्या बाळाचे बाबा त्याला एक बोल आणि एक गाय भेट म्हणून देतात. याचा उपयोग अनेक सांस्कृतिक समारंभांमध्येही करण्यात येतो. बोदी समुदायात मुलीला लग्नात हुंडा म्हणून गाय भेट देण्याची प्रथा आहे. याशिवाय, गाय बोदी जमातीच्या आयुष्याचा आधार मानली जाते. हीच्या माध्यमातून या लोकांना दूध, तूप, दही, लोणी, गोमूत्र, शेण आणि रक्त असे उपयुक्त पदार्थ उपलब्ध होतात.

या समारंभाची असते उत्सुकता

बोदी समुदायाचे लोक दरवर्षी दून किंवा जुलै महिन्यात ‘काएल’ समारंभ साजरा करतात, ही नव्या वर्षाची सुरुवात असल्याचे ते मानतात. या समारंभाची तारीख कोमोरो ठरवतो. या दरम्यान जी व्यक्ती अधिक जाडी असते, त्याला आयुष्यभर एखाद्या हिरोसारखी वागणूक मिळते. तर येणाऱ्या नव्या वर्षाचे अनुमान लावण्यासाठी समारंभाच्या शेवटच्या दिवशी समुदायातील ज्येष्ठ व्यक्ती चंद्रावर आधारित त्यांच्या नवीन वर्षाची घोषणा पारंपारिक पद्धतीने उलट्या पद्धतीने मोजणी करून ठरवतात. या अनुमानासाठी काही गायींना जखमी करण्यात येतं आणि तीचं रक्त कोमोरोवर टाकलं जातं आणि कोमोरो नवीन वर्ष, सण आणि अन्य महत्त्वाच्या दिवसांची घोषणा करतो.

रक्त काढण्यासाठी गायींचा बळी दिला जात नाही

गाय या समुदायात अतिशय पवित्र मानली जाते. म्हणून तिचं रक्त काढण्यासाठी तिची हत्या न करता तिच्या नसांमध्ये छेद करून रक्त काढलं जातं त्यानंतर मातीच्या मदतीने गायीच्या जखमा भरल्या जातात.

६ महिने आधीपासूनच सुरू होते ‘फॅट मॅन ऑफ द ईयरची’ तयारी

या समारंभात सहभागी होण्यासाठी ६ महिने आधीच प्रत्येक घरातून एक अविवाहित तरुणाला पाठवलं जातं, याला अनेक महिने रक्त आणि दूधाचा रतीब लावला जातो. यामुळे त्याचं वजन आपोआप वाढतं. या काळात महिलांशी शारीरिक संबंधही ठेवले जात नाहीत. अशातच या कुटुंबातील महिला दररोज यासाठी बांबूच्या भांड्यात गायीचं रक्त आणि दूध घेऊन येते या दोन्हींच मिश्रण या व्यक्तींना सेवनासाठी देण्यात येते. या दरम्यान आपलं शरीर झाकण्यासाठी लोकं माती आणि राखेचा वापर करतात. नवीन वर्षाची घोषणा होताच सर्व सहभागी जाडीची ओळख व्हावी म्हणून कोमोरो आणि समुदायातील ज्येष्ठ व्यक्तींच्या समोरून जावं लागतं. त्यानंतर कोमोरो ‘फॅट मॅन ऑफ द ईयरची’ निवड करतात.

विजेत्याला मिळतं बक्षीस

या स्पर्धेतील विजेत्याला समुदायात प्रसिद्धी मिळते. या समारंभात जिंकणाऱ्याला त्याला आवडणाऱ्या महिलेशी विवाह करण्याचे स्वातंत्र्य असते. बोदी समुदायात मोठी कंबंर असलेल्या मुलींना सुंदर म्हणण्याचा प्रघात आहे. कार्यक्रमादरम्यान पुरुषांना राख आणि मातीने आंघोळ घालण्यात येते. यानंतर मेजवानी आयोजित केली जाते. यात महिला विशेष नृत्य सादर करतात. याला ‘हेट’ असं संबोधलं जातं.