त्याने सेक्स डॉलसोबत केला विवाह; आता या बॉडीबिल्डरच्या आयुष्यात येणार आहे अशी व्यक्ती की वाचल्यानंतर तुम्हीही व्यक्त कराल आश्चर्य

भविष्यात मला एका मेल डॉलसोबत राहण्यास आवडेल तसेच एका मेल डॉलचा विवाह रचण्याची माझी इच्छा आहे. Threesome रिलेशनशिपमध्ये असलेल्या बॉडीबिल्डरच्या आयुष्यातील तिसरी लुना नावाच्या डॉलसोबत या मेल डॉलचा विवाह रचणार, असंही त्याने सांगितलं.

    दोन सेक्स डॉल्ससोबत विवाह करणाऱ्या कझाकस्तानमधील बॉडीबिल्डरच्या वैवाहिक आयुष्यात मेल डॉलची एन्ट्री होणार आहे. युरी टोलोच्को असे बॉडीबिल्डरचं नाव असून तो एका चारित्र, पुतळ्याशी संबंध ठेवणाऱ्या अलौकिक नात्यात गुंतला आहे. एका रेडिओ शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यानं हा खुलासा केला आहे. युरी हा यानिमित्त भव्य सोहळा आयोजित करणार असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

    मुलाखतीत तो म्हणाला की, भविष्यात मला एका मेल डॉलसोबत राहण्यास आवडेल तसेच एका मेल डॉलचा विवाह रचण्याची माझी इच्छा आहे. Threesome रिलेशनशिपमध्ये असलेल्या बॉडीबिल्डरच्या आयुष्यातील तिसरी लुना नावाच्या डॉलसोबत या मेल डॉलचा विवाह रचणार, असंही त्याने सांगितलं.

    नोव्हेंबर २०२० मध्ये बॉडीबिल्डर असलेल्या युरीनं मार्गो नावाच्या सेक्स डॉलसोबत लग्न केलं होतं. ज्यानंतर सेक्स डॉलसोबत लग्न करणारा बॉडीबिल्डर हा पहिल्यांदा जगासमोर आला होता. लग्नाच्या आठ महिन्यापूर्वीच तो मार्गो नावाच्या डॉलसोबत प्रेम संबंधात होता. नुकतेच लग्नाच्या काही दिवसानंतरच डिसेंबरमध्ये ही डॉल तुटली होती आणि दुरुस्तीसाठी एका दुकानात पाठवली होती. ज्यानंतर इन्स्टाग्रामवर याविषयी बोलताना बॉडीबिल्डरने मार्गोला धोका दिला असल्याचं मान्य केलं. त्यानंतर त्याने मार्गो डॉलसोबत घटस्फोट घेतला.

    दरम्यान, मार्चमध्ये युरीनं त्याच्या आयुष्यात लोला नावाची सेक्स डॉल आली असल्याची माहिती दिली. तसेच मार्गोसोबत तुटलेल्या नात्याविषयी मी जास्त सांगू शकत नाही, असंही त्यानं यावेळी सांगितलं होतं. काही दिवसानंतर युरीनं लुना नावाच्या तिसऱ्या डॉलविषयी सांगताना आपण Threesome रिलेशन्शिपमध्ये असल्याची घोषणा केली. तसेच लोला आणि मी मिळून हीचे संगोपन करणार असल्याचं सांगितलं होतं.

    Bodybuilder who is in threesome with 2 sex dolls wants to introduce male doll in relationship