‘बॉयफ्रेंड डे’ साजरा करण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या महत्त्व…

आज Boyfriend's Day 2021 आहे. इतर दिवसांप्रमाणेच हा सुद्धा एक दिवस आहे. परंतु संपूर्ण जगभरात अगदी कमीच लोकं हा दिवस साजरा करत असतात. तर काही जणांना प्रश्न पडतो की, असा कोणता दिवस तरी असतो का? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे होय.

  नवी दिल्ली : संसार करताना अनेक प्रकारच्या नाती-गोती तयार होत असतात. त्यामुळे संपूर्ण जगात विविध प्रकारचे डे साजरे केले जातात. फ्रेंडशिप डे (Friendship Day), सिस्टर्स डे (Sisters Day), तसेच मदर्स डे (mother’s day) अशा प्रकारचे अनेक डे जगभरात साजरे केले जातात. तसेच या दिवसाला खूप महत्त्व देखील आहे. या दिवशी आपण नात्यांमध्ये दूरावा न होऊन देता, ती नाती आपण कशाप्रकारे जपली पाहिजेत आणि मजबूत कशी करावी. या सर्व गोष्टी आपण डेच्या माध्यमातून शिकत असतो.

  आज Boyfriend’s Day 2021 आहे. इतर दिवसांप्रमाणेच हा सुद्धा एक दिवस आहे. परंतु संपूर्ण जगभरात अगदी कमीच लोकं हा दिवस साजरा करत असतात. तर काही जणांना प्रश्न पडतो की, असा कोणता दिवस तरी असतो का? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे होय.

  ‘बॉयफ्रेंड डे’साजरा करण्याचं नेमकं कारण काय?

  दरवर्षी ३ ऑक्टोबरला ‘राष्ट्रीय बॉयफ्रेंड डे’ (Boyfriend Day) हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीबद्दल सन्मान व्यक्त करतात. या दिवशी त्यांना त्यांच्या आयुष्यात ते खूप महत्वाचे आहेत, याची जाणीव करून दिली जाते. चला तर मग जाणून घेऊयात ‘बॉयफ्रेंड डे’शी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी…

  इंटरनेटमुळे हा दिवस साजरा करणे शक्य

  हा दिवस मुलांसाठी खूप महत्त्वाचा आणि स्पेशल असतो. कारण त्यांना या दिवशी समजतं की, त्यांची गर्लफ्रेंड त्यांच्यावर किती प्रेम करते आणि तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान आहात. इंटरनेटवर या दिवसाची सुरूवात २०१४ रोजी सुरू झाली. परंतु मार्च २०१६ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून या दिवसासाठी हजारोंच्या संख्येने ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी बॉयफ्रेंड हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटमुळे हा दिवस साजरा करणे शक्य झालं आहे.