britain woman cycles around londona nude thong to raise money for mental health charities after losing her cousin
कडाक्याच्या थंडीत नग्न होऊन 'ती' चालवत होती सायकल; कारण वाचून तुमच्याही डोक्याला येतील झिणझिण्या

मानसिक आरोग्य (Mental Health) हा जगाला भेडसावणारा गहन प्रश्न आहे. यामुळे अनेकजण टोकाचा निर्णय घेत हे आयुष्य संपविण्याचा (end life) निर्णय घेतात आणि तो अंमलात आणतातही. जगभरात अशा अनेक संस्था आहेत, ज्या लोकांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर (problems) काम करत असून या कामासाठी निधी उभारणं (Fundraising) हा या सर्वांच्या समोरील 'आ वासून' उभा ठाकलेला प्रश्न आहे.

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने स्वत:कडे आपले लक्ष वेधून घेण्यास भाग पाडले आहे. झालं असं की, कडाक्याच्या थंडीत ही महिला नग्न होऊन सायकल चालवत होती. अशा अवस्थेत सायकल चालवत तिने १० किमीचं अंतर कापलं. तिचा असा काय नाईलाज झाला की तिला हे कृत्य का करावं लागलं याबाबत जाणून घेऊया.

मानसिक आरोग्य हा जगाला भेडसावणारा गहन प्रश्न आहे. यामुळे अनेकजण टोकाचा निर्णय घेत हे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतात आणि ते अंमलात आणतातही. जगभरात अशा अनेक संस्था आहेत, ज्या लोकांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर काम करत असून या कामासाठी निधी उभारणं हा या सर्वांच्या समोरील ‘आ वासून’ उभा ठाकलेला प्रश्न आहे.

ब्रिटनमध्ये अशाच एका महिलेला मानसिक आरोग्याबाबत करण्यात येणाऱ्या कामात आपलाही खारीचा वाटा असं वाटलं. यासाठी तिने काहीतरी भन्नाट करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास नग्नावस्थेत १० किमीचे अंतर या महिलेने सायकल चालवत पार केले आणि आपले योगदान देत पैसे जमविण्याचा प्रयत्न केला. या महिलेचं नाव केरी बार्न्स आहे. केरी यांनी मानसिक आरोग्यबाबत होत असलेल्या कामाप्रती आपले योगदान म्हणून निधी गोळा करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत लंडनच्या रस्त्यावर नग्नावस्थेत सायकल चालविली.
बहिणीने केलेल्या आत्महत्येमुळे विचारचक्र सुरू झालं

याविषयी सांगताना केरी बार्न्स म्हणते, मी चुलतबहिणीसोबत वाढले. आम्ही दोघीही एकत्र शाळेत जात होतो, सोबतच खेळत होतो, एकमेकींना चिडवण्याची आम्ही एकही संधी कधीच सोडली नाही आणि आम्ही खूप धिंगाणा करत होतो. मोठे झाल्यानंतर आम्ही आपापल्या कामात गढून गेलो. एक दिवस बातमी आली की, माझ्या याच बहिणीने आत्महत्या केली. यामगचं कारण मला कळू शकलं नाही. तिच्या आयुष्यात असं काय घडलं की तिला या सुंदर जगाचा निरोप घ्यावा लागला.

मोलकरणीने दिली आयडियाची कल्पना

बहिणीने आत्महत्या केल्यानंतर मानसिक आरोग्याबाबतचे आकडे पाहून तिची बोबडीच वळली आणि तिला धक्काच बसला. यानंतर तिने या दिशेने काम करण्याचं पक्कं केलं. याविषयी नेमकं काय आणि कसं करायचं याबाबतचे विचार करून करून डोक्याचा पार भुगा झाला होता पण काय करावं हे उमगत नव्हतं. ती घरात याविषयी नेहमी चर्चा करत असे. एक दिवस केरी तिच्या मोलकरणीसोबत गप्पा मारत बसली होती, तेव्हा मोलकरणीने थट्टा-मस्करीत तिला असं सुचवलं की, नग्न होऊन कडाक्याच्या थंडीत सायकल चालवं. केरीच्या मनाला हा विचार खूपच भावला आणि अखेर नग्न अवस्थेत ती लंडनच्या रस्त्यावर सायकल चालवत निघाली.

आत्महत्या रोखणं हाच आहे उद्देश

एका अहवालानुसार, केरी म्हणते, आत्महत्या करण्यापासून परावृत्त करणं हाच मुख्य हेतू होता आणि यासाठी काम करणारी धर्मादाय संस्था एमआईएनडीसाठी तिला काही निधी उभारावा असं वाटत होतं. विशेषत: जगभरात कोरोना विषाणूमुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत मानसिक आरोग्याबाबत अधिकाधिका आव्हाने निर्माण झाली,यामुळे आत्महत्येसारखं टोकाचा निर्णय घेण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.

प्रथम स्वत:च्या मनाची केली तयारी

थंडीचा कहर पाहता केरीने स्वत:च्या मनाची प्रथम तयारी केली. नग्नावस्थेत लंडनच्या रस्त्यांवर सायकलने प्रवास करण्याआधी केरीने थंड पाण्याने आंघोळ केली पण असं केल्याने तिला फार कही फायदा झालाच नाही. एवढं करूनही तिला बोचऱ्या थंडीचा सामना करावाच लागला. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. विशेषत: वाटरलू पूल पार करताना तिला बोचऱ्या थंडीचा अंदाज आला, पण एकंदर हा दिवस चांगला गेला असं केरीने स्पष्ट केलं.