मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे : दाढी मोठी असेल तर कोरोनाचा धोका अधिक? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलंय शास्त्रीय कारण

अनेकांनी लॉकडाऊन काळात आपले केस आणि दाढी वाढवली. कुणी या नव्या स्टाईलचा आनंद घेत आहे तर कुणी या वाढलेल्या केसांना आणि दाढीला वैतागलंय पण कोरोनाचा धुमाकूळ सुरु असताना खरंच आरोग्यासाठी केस आणि दाढी वाढवणं चांगलं आहे का?

    नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने देशभरात थैमान घातल्याने जनतेवर अनेक निर्बंध लादले गेले. कडक लॉकडाऊन लावला गेला. यात अनेक दुकाने बंद ठेवली गेली. त्यात कोरोनात शारीरिक अंतर ठेवणं अनिवार्य असल्याने सलूनची दुकाने उघडणं घातकच. पर्यायाने अनेकांनी लॉकडाऊन काळात आपले केस आणि दाढी वाढवली. कुणी या नव्या स्टाईलचा आनंद घेत आहे तर कुणी या वाढलेल्या केसांना आणि दाढीला वैतागलंय पण कोरोनाचा धुमाकूळ सुरु असताना खरंच आरोग्यासाठी केस आणि दाढी वाढवणं चांगलं आहे का हे आपण जाणून घेऊयात.

    डॉक्टरांचं म्हणणं काय?

    अमेरिकेतील त्वचाशास्त्र अकादमीचे सदस्य डॉ. अँथनी रोजी हेल्थलाईन डॉट कॉमशी बोलताना म्हणाले,

    • “तुमची दाढी जास्त दाट असेल तर मास्क तुमच्या तोंडावर, जबड्याच्या भागात नीट बसणार नाही.
    • त्यामुळे मोकळ्या जागेतून हवेतील कोरोनाचे विषाणू तुमच्या मास्कच्या आतमध्ये प्रवेश करु शकतात.
    • याचाच अर्थ जर तुमची जाडसर, लांब दाढी असेल, जेव्हाही तुम्ही श्वास घ्याल, बोलाल, खोकाल तेव्हा संसर्गाचे कण तुमच्या मास्कमध्ये जिथे गॅप असेल तिथून बाहेर पडू शकतात किंवा त्या गॅपमधून आलेल्या कणांनी तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.
    • त्यामुळे वेळोवेळी आपली दाढी ट्रीम करत राहा, जेणेकरुण तुम्हाला संसर्गाचा धोका कमी असेल.”
    • आपल्या चेहऱ्यावरील केस ट्रिम करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काही पद्धती फॉलो करणं गरजेचं आहे.
    • आपण काही सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी अगदी सलूनसारखी दाढी ट्रीम करु शकतो.
    • स्वच्छ दाढी ठेवण्यासाठी आपण काही चांगल्या प्रॉडक्टचा वापर करु शकतो जे आपली दाढी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात.

    can your beard increse the risk of covid know the story in details