वेलचीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर होणार कमी; मधुमेहात ठरतोय गुणकारी

चहाला लोकांचीही पहिली पसंती असते आणि चहाशिवाय भारतीय संस्कृतीत पाहुणचार पूर्ण होऊच शकत नाही. एका संशोधनानुसार, वेलची घातलेला चहा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे, कारण यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

  चाय पे चर्चा म्हटलं की लोकांना हल्ली खूपच बोलायची खुमखुमी येते ना राव. कारणही तसंच आहे. एक चहावाला आज देशाचा गाडा चालवतो म्हटल्यावर कायसोपी गोष्ट नाही. तर चर्चेचा विषय आहे चहा. आता घरात आलेल्या पाहुण्याचं स्वागत करायचं म्हणजे चहासोबत समोसे, बिस्कीटे असतील तर मग काय सोने पे सुहागा.

  चहाला लोकांचीही पहिली पसंती असते आणि चहाशिवाय भारतीय संस्कृतीत पाहुणचार पूर्ण होऊच शकत नाही. एका संशोधनानुसार, वेलची घातलेला चहा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे, कारण यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक असल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. म्हणूनच वेलची घातलेला चहा हा मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.

  • वेलचीत अनेक पोषक तत्वे आढळतात, जी आरोग्याला स्वस्थ आणि ताजंजवानं ठेवण्यास खूपच मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात वेलची चहा शरीरासाठी कसा फायदेशीर आहे? उन्हाळ्याच्या दिवसांत वेलचीचा चहा पिणं आरोग्यासाठी चांगले असते. याने फक्त आपला मूड रिफ्रेशच होत नाही, तर याचे अगणित फायदेही आहेत.
  • असं म्हणतात की, वेलची चहा फक्त चवीलाच चांगला लागत नाही, तर त्याने आपलं पाचन-तंत्रही उत्तम राहतं कारण, यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे मेटाबॉलिज्म वाढविण्यास मदत करतात.
  • जर तुम्ही तणावाच्या गर्तेत सापडलेले असाल, तर वेलचीचं सेवन तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. असं निर्दशनास आलं आहे की, वेलची चावून खाल्ल्याने हार्मोन्स मध्ये तात्काळ बदल झालेले पाहायला मिळतात आणि तुमची तणावातून मुक्तता होते.
  • असंही म्हटलं आहे की, वेलचीच्या सेवनाने श्वसनाचा त्रास, जसे की दम लागणे, जास्त वाहणारं नाकं आणि खोकल्यापासून आराम मिळतो. सोबतच फुप्फुसांमधील समस्या दूर करण्यातही वेलची सहाय्यक ठरते. म्हणून आल्याचा चहा पिण्याऐवजी वेलचीचा चहा प्यायला हवा.
  • कमी जास्त प्रमाणात ताप आल्यानंतर लोकांच्या तोंडाची चव बिघडते, अशातच वेलचीचा चहा प्यायल्याने तोंडाची चवही बदलते आणि तिच्या वासानेही तापात आराम पडतो. विशेषत: एखाद्याला सर्दी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर लोकं अशा त्रासात वेलचीच्या चहाला पसंती देतात.
  • जर तुम्हाला उल्टी होईल असं वाटत असेल तर वेलची घातलेला चहा प्यायल्याने यापासून त्वरित आराम मिळतो.