Celebrity chef Amrita Raichand signs petition on Change.Org with Falada Pure & Sure, requesting #CleanFoodForAll

स्वच्छ आहार सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सजगता निर्माण करत प्युअर अँड श्युअर या भारताच्या अग्रगण्य ऑर्गेनिक आणि स्वच्छ अन्नपदार्थ विषयक ब्रँडने शेफ अमृता रायचंद यांच्यासोबत Change.org वर एका याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई: स्वच्छ आहार सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सजगता निर्माण करत प्युअर अँड श्युअर या भारताच्या अग्रगण्य ऑर्गेनिक आणि स्वच्छ अन्नपदार्थ विषयक ब्रँडने शेफ अमृता रायचंद यांच्यासोबत Change.org वर एका याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये सरकारला किटकनाशकांच्या वापरावर बंदी आणणे तसेच सर्वांसाठी #CleanFoodForAll ची खातरजमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

बालकांच्या संगोपनात आईची भूमिका महत्त्वाची असते. त्यांना योग्य ते पोषण मिळत आहे याची खातरजमा तिने करणे आवश्यक ठरते. मुलांना त्यांचे आरोग्य आणि एकंदर विकासाकरिता पोषक चौरस आहाराची गरज असते. आज आपण ज्या अन्नपदार्थांचे सेवन करतो, त्यात कार्बेंडेझीम, क्लोरपिरीफॉस, मोनोक्रोटोफॉस आणि डायमेथोएटसारखी घातक रसायने असतात. शरीरात अशी घातक रसायने आणि अन्य प्रदूषकांचा शिरकाव झाल्यास पेशी विकासाला अडथळा निर्माण होतो तसेच काही महत्त्वाचे अवयव दीर्घकालीन निकामी होऊ शकतात. सध्याची स्थिती पाहता बालकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होण्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्यांचे विषाणूंपासून संरक्षण होईल. बालकांच्या आहारात स्वच्छ अन्नपदार्थ असल्याची खातरजमा करणे आवश्यक असते. स्वच्छ म्हणजे घातक रसायनांपासून मुक्त!

स्वच्छ आहाराचे महत्त्व या विषयावर बोलताना फलादा ऑर्गेनिक कन्झ्युमर प्रोडक्ट्स प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर सूर्या शास्त्री म्हणाले की, “फलादा प्यूअर अँड श्युअर’मध्ये प्रत्येकाला स्वच्छ आहार – किटकनाशक, एडीटीव्ह किंवा कृत्रिम पदार्थरहित मिळाला पाहिजे, या सूत्रावर आमचा विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, ही याचिका मानवहिताची आहे. हिची योग्यरितीने अंमलबजावणी केल्यास लवकरच आंदोलन उभे राहील. आमच्या वचनबद्धतेला आवाज फुटून सजगता निर्माण होईल आणि #CleanFoodForAll उपलब्ध होण्यात मदत मिळेल. त्याशिवाय सध्याच्या महासाथीच्या वातावरणात सर्वांची रोगप्रतिकार शक्ती लवचीक आणि मजबूत होण्याची आवश्यकता आहे. मानवी आरोग्याला घातक असलेली रसायने ही आमच्या याचिकेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे सरकारने अशा घटकांवर बंदी आणून बालकांना आरोग्यदायक आहार मिळतो आहे, याची खातरजमा करणे आवश्यक ठरते. आम्हाला उद्योग क्षेत्रातून पाठींबा मिळेल याची आम्हाला खात्री वाटते आणि याचिकेवर सही करून अनेक लोक आंदोलनात सहभागी होतील.

या नवीन हातमिळवणीविषयी बोलताना शास्त्री म्हणाले की, “बालकांच्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचे महत्त्व आईशिवाय कोणालाच कळत नाही. शेफ अमृता रायचंद या प्युअर अँड श्युअर’च्या स्वच्छ आहार सेवन द्रष्टेपणाबद्दल सजग आहेत. त्या देशातील माता-भगिनींशी जोडलेल्या आहेत. आमच्याकरिता हा योग जुळून आला असे म्हणता येईल. शेफ अमृता यांच्या माध्यमातून अनेक घरांपर्यंत पोहोचणार आहोत. मागे वळून पाहण्याची गरज नाही. आमचे कॅम्पेन प्रगतीपथावर राहील, ही आशा व्यक्त करतो. आपल्या बालकांना स्वच्छ आहार मिळावा ही अनेक पालकांची मागणी असून ते देखील सहभागी होतील.”

एकत्र येऊन याचिकेवर सही करण्याविषयी बोलताना सेलेब्रिटी शेफ अमृता रायचंद म्हणाल्या की, “ही याचिका फाईल झाल्याने मी आनंदी आहे. माझ्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असे मी मानते. या उपक्रमासारखे काहीतरी सुरू करणे ही आजची गरजच होती आणि हीच योग्य वेळ आहे, यावर माझा विश्वास आहे. मी एक शेफ आहे, आई आहे आणि स्वच्छ आहाराविषयी आग्रही असते. मी कायमच स्वत:ला प्रश्न विचाराचे. बालकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी आहार मिळावा म्हणून विचार करायचे. रसायन, प्रदूषके, कृत्रिम साहित्य आणि घातक एडीटीव्ह-रहित आहार सेवन करण्याचा अधिकार प्रत्येक बालकाला आहे. भेसळयुक्त आहाराचे घातक परिणाम, बालकांच्या आरोग्यावर कशाप्रकारे प्रभाव दिसतो हे मुद्दे याचिकेत अधोरेखित करण्यात आले आहेत. या याचिकेच्या माध्यमातून देशाला स्वच्छ, आरोग्यदायी आहार सेवन सवयीविषयी सजग करण्यात आले आहे. ग्राहकांना अतिमहत्त्वाची माहिती उपलब्ध करून त्यांचे सबलीकरण करण्याचा हा समंजस मार्ग ठरला. आमच्या प्रयत्नाला यश मिळेल आणि आम्हाला ध्येय गाठता येईल असा विश्वास वाटतो.”

प्युअर अँड श्युअर आणि शेफ अमृता रायचंद यांनी देशातील जनतेला Change.org वर भेट देऊन याचिकेवर सही करण्याचे आवाहन केले आहे. पुरेशा स्वाक्षऱ्या जमा झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांकडे हा विषय वर्ग करण्यात येईल. जेणेकरून आपल्या बालकांचे भविष्य उज्ज्वल होण्यात मदत होईल.

याचिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.