शेफच्या हॉटनेस तडका अन चटकदार पदार्थांच्या रेसिपीने ‘हे’ युट्युब चॅनल वाढतायत लाखो फॉलोवर्स

लाखो सबस्क्राईबर असलेले हे चॅनल बंगाली भाषेतील असून त्याचे नाव Unique Village Food असे आहे. मागील सहा महिन्यांपासून या चॅनेलवर वेगवेगळ्या रेसिपींचे फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत.

    मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच यूट्यूब चॅनेल पैसे कमवण्याचे मोठे साधन आहे. क्रिएटिव्ह कन्टेन्टच्या माध्यमातून चांगल्या प्रकाराचे अर्थाजनासोबतच प्रसिद्धीही मिळताना दिसून येत आहे. सध्या युट्युबवर एक बंगाली चॅनेल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या युट्युब चॅनलवर (youTube Channel) एकूण पाच फूड रेसीपीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत.

    या चॅनेलमध्ये चटकदार पदार्थ आणि हॉटनेसचा तडका (Chef’s Hotness )असून त्यावर गावाकडील वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करुन दाखवले जातात. या चॅनेलवर फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे.

    चॅनेलला एक लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर
    लाखो सबस्क्राईबर असलेले हे चॅनल बंगाली भाषेतील असून त्याचे नाव Unique Village Food असे आहे. मागील सहा महिन्यांपासून या चॅनेलवर वेगवेगळ्या रेसिपींचे फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत. असले तरी या चॅनेलला आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलं आहे. या चॅनेलवर अतिशय खमंग पदार्थ तयार करुन दाखवले जातात.