चिकन हा जगभरात सर्वाधिक सामान्यपणे सेवन केला जाणारा प्रथिनांनी समृद्ध आहार

चिकन हा जगभरात सर्वाधिक सामान्यपणे सेवन केला जाणारा प्रथिनांनी समृद्ध आहार आहे. चिकन विविध प्रकारच्या कट्समध्ये उपलब्ध होते. त्यात ब्रेस्ट, ड्रमस्टिक्स, थाइज आणि विंग्स असे प्रकार असतात.

  मुंबई : प्रथिने हा आपल्या मूलभूत आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण तरीही सुमारे एक अब्ज लोकांना प्रथिनांची कमतरता भासते. भारतातील प्रथिनांची कमतरता ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये आहे. शिफारस करण्यात आलेला प्रथिनांचा आहार ६०-९० ग्रॅम असला तरी भारतीय लोक फक्त१०-३० ग्रॅम प्रथिनांचे सेवन करतात.

  ‘राष्ट्रीय प्रथिने दिवस’ हा शरीराच्या सर्वाधिक मूलभूत बांधणी करणाऱ्या घटकाचे जे हाडांचा विकास करते, त्वचा, कार्टिलेज, रक्त चांगले ठेवते आणि तुमच्या स्नायूंची शक्ती वाढवते, महत्त्व पटवणारा दिवस आहे.

  चिकन हा जगभरात सर्वाधिक सामान्यपणे सेवन केला जाणारा प्रथिनांनी समृद्ध आहार आहे. चिकन विविध प्रकारच्या कट्समध्ये उपलब्ध होते. त्यात ब्रेस्ट, ड्रमस्टिक्स, थाइज आणि विंग्स असे प्रकार असतात. हे सर्व कट्स प्रथिनांनी समृद्ध असले तरी प्रत्येक कटचा एक वेगळा फायदा असतो आणि त्यामुळे शरीराला काही फायदे मिळतात.

  त्यातील काही फायदे खालीलप्रमाणे आहेत

  चिकन ब्रेस्ट:

  चिकन ब्रेस्ट हा प्राधान्याने सेवन केला जाणारा कट असून त्यामुळे बॉडीबिल्डर्सना फायदा होतो. ते वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांमध्येही लोकप्रिय आहे. एका उत्तमरित्या शिजवलेल्या चिकन ब्रेस्टमध्ये प्रति १०० ग्रॅम्समागे ३१ ग्रॅम प्रथिने आणि १०० ग्रॅममागे १६४ कॅलरीज असतात. या कॅलरीज मुख्यत्वे प्रथिनांमधून (८० टक्के) येतात आणि उर्वरित फॅट्स (२० टक्के) असतात.

  चिकन थाइज:

  चिकन थाइज हे रंगाने थोडे गडद असतात आणि कार्यरत स्नायूंना ते ऑक्सिजन पुरवतात. उत्तमरित्या शिजलेल्या चिकन थायमध्ये प्रति १००ग्रॅममागे २६ ग्रॅम प्रथिने असतात आणि १०० ग्रॅममागे २०९ कॅलरीज असतात. इथे ५३ टक्के कॅलरी प्रथिनांमधून येतात तर ४७ टक्के फॅटमधून येतात.

  चिकन ड्रमस्टिक:

  चिकन ड्रमस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर अमिनो आम्ले असतात. त्यांचा वापर गर्भावस्थेत, बालपण आणि किशोरवयात वाढ आणि विकासासाठी केला जातो. मानवी शरीराला २१ अमिनो आम्लांची गरज असते आणि ड्रमस्टिक्सधून त्यातील १२ मिळतात. एक चिकन ड्रमस्टिक प्रति १०० ग्रॅममागे २८.३ ग्रॅम प्रथिने दिली जातात.

  चिकन विंग्स:

  चिकन विंग्सचा आर्थरायटिस आणि डायबेटिसवर चांगला परिणाम होतो. त्याचा वापर हायपर टेन्शन, स्ट्रोक आणि हृदय विकारांच्या उपचारांसाठीही केला जातो. त्यामुळे शरीराला दुखापती आणि फ्रॅक्चर्सपासून बरे होण्यात मदत होते आणि आपली प्रतिकारशक्ती वाढते. त्यात प्रति १०० ग्रॅममागे ३०.५ ग्रॅम प्रथिने असतात.

  चिकनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चिकनच्या प्रत्येक भागाचे आपले फायदे असतात आणि व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य आणि फिटनेसच्या फायद्यावर आधारित राहून डाएट तयार केले पाहिजे. कमी कार्ब्सयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या लोकांना चिकनच्या जाड भागांचा फायदा होईल तर वजन कमी करू इच्छिणारे तसेच बॉडी बिल्डर्सना चिकन ब्रेस्टचा फायदा होतो. चिकनचे सेवन करण्यापूर्वी चिकनचे सर्व भाग उच्च तापमानाला शिजवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर चिकन ताजे खाणे योग्य ठरते आणि ते फ्रिजमध्ये ठेवलेले असल्यास २-३ दिवसांत खाल्ले गेले पाहिजे.

  मथुलक्ष्मी जी., संस्थापक आणि आहारतज्ञ