coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

अमेरिकेच्या आलास्का शहरातील दोन जणांनी फायजरची लस (COVID-19 vaccine) टोचून घेतली. त्यानंतर लगेचच अवघ्या काही मिनिटांतच त्यांची प्रकृती बिघडली. हे दोघेही आरोग्य सेवक असून एकाच रुग्णालयात काम करतात.

संपूर्ण विश्वात कोरोना विषाणू लसीच्या चाचण्या सुरू आहेत. काही ठिकाणी काही लसींचा (Coronavirus Vaccine) प्रभाव दिसू लागला असून काहींचे दुष्परिणाही समोर येऊ लागले आहेत. आता या चढाओढीत फायजरचंही नाव जोडलं गेलं आहे.

अमेरिकेच्या आलास्का शहरातील दोन जणांनी फायजरची लस (COVID-19 vaccine) टोचून घेतली. त्यानंतर लगेचच अवघ्या काही मिनिटांतच त्यांची प्रकृती बिघडली. हे दोघेही आरोग्य सेवक असून एकाच रुग्णालयात काम करतात.

पहिली आरोग्य सेविका ही मध्यम वयाची महिला आहे. यांना याआधी कधीच ॲलर्जी झाल्याचं आठवत नाही. लस टोचल्यानंतर १० मिनिटांतच त्यांची प्रकृती खालावू लागल्याची माहिती जूनोच्या बार्टलेट रिजनल रुग्णालयातल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. महिलेचा चेहरा आणि गळ्यावर चट्टे आले, श्वास घ्यायलाही तिला त्रास जाणवू लागला आणि तिच्या हृद्ययाचे ठोकेही वाढले.

रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या वैद्यकीय संचालक डॉ. लिंडी जोन्स यांनी सांगितले की ॲलर्जीच्या औषधाआधी या महिलेला एपिनफ्रिनचा एक डोस देण्यात आला होता. त्याची लक्षणे कमी झाली पण काही काळानंतर पुन्हा सुरू झाली. त्यानंतर तिच्यावर स्टेरॉइड्स आणि एपिनफ्रिन ड्रिपने उपचार केले. जेव्हा डॉक्टर्सनी काही काळानंतर ड्रिप काढण्याचा प्रयत्न केला पण लक्षणे पुन्हा दिसू लागली त्यानंतर या महिलेला अतिदक्षता विभागात हलविण्यात आलं. रात्रभर देखरेखीखाली ठेवल्यानंतर बुधवारी सकाळी तिची ड्रिप काढण्यात आली.

दुसऱ्या आरोग्य सेवकाला लस टोचल्यानंतर १० मिनिटांतच डोळ्यांना सूज, चक्कर येणं, घशात खवखव सारख्या समस्या जाणवू लागल्या. या तरुणावर काही ॲलर्जीच्या औषधांनी उपचार करण्यात आले. एका तासानंतर या तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

ब्रिटिश वैद्यकीय नियामक असे म्हणतात की ज्या लोकांना अ‍ॅनाफिलेक्सिस आहे किंवा त्यांना औषधे किंवा काही खाद्यपदार्थाची ॲलर्जी आहे, अशा लोकांनी फायजर-बायोएनटेकची कोविड-१९ची लस घेऊ नये.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मते, ज्या लोकांना पूर्वीपासूनच ॲलर्जीचे दुष्परिणाम होतात अशा लोकांनी ही लस टोचून घेऊच नये. मध्यम वयाच्या रुग्णांना ही लस टोचल्यानंतर ही लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर ॲलर्जीचे उपचार करण्यात येतात.

आमची लस ही स्पष्ट इशाऱ्यासह देण्यात येत आहे. ज्यांना एनाफिलेक्सिस किंवा ॲलर्जीचा त्रास आहे त्या लोकांनी पुढल्या उपचारांसाठी सज्ज रहायला हवं. असं फायजरने सांगितलं. जर आवश्यकता असेल तर लसीच्या लेबलच्या भाषेतही बदल करता येऊ शकतो असेही फायजरने म्हटलं आहे.

अशा प्रकरणांमध्ये त्यांची लस देणं थांबविण्यात येणार नाही आणि या सगळ्या सूचना अधिक पारदर्शक होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत असल्याचं फायजरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

तथापि ४४,००० स्वयंसेवकांवर केलेल्या प्रायोगिक चाचण्यांवर ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. अलास्काची ही दोन प्रकरणं समोर आल्यानंतर लसीचे संभाव्य दुष्परिणामांबाबत लोकांची चिंता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

ही लस अमेरिकेत याच आठवड्यात द्यायला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम आरोग्य सेवक आणि नर्सेसना ही लस देण्यात येणार आहे. FDAचे माजी वैज्ञानिक संचालक गुडमॅन यांच्या मते, लस टोचण्याचे अशाप्रकारचे दुष्परिणाम असू शकतात, ही गोष्ट आपल्याला आणखी सखोल अभ्यासावी लागणार आहे.