Eye diabetic चा धोका वाढतोय, आता दोन मिनीटात कळेल तुम्हाला डायबेटीज आहे की नाही!

शंकरा आय फाउंडेशन अँड लेबेन केअर यांनी नेत्र नावानी आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर आधारित यंत्र तयार केलं आहे जे अवघ्या काही मिनिटांतच डोळ्यातील डायबेटिस ओळखू शकतं.

    जर तुम्हाला डायबेटीज असेल तर त्याचा सर्वात आधी डोळ्यांवर परिणाम होतो. डोळ्यांशी संबंधित डायबेटिज होते. डोळ्यांशी संबंधित डायबेटिस एखाद्या रुग्णाला झालाय का हे तपासण्यासाठी डायबेटिक रेटिनोपॅथी हे तंत्र वापरतात. पण हे तंत्र वापरणारे तज्ज्ञ भारतात कमी प्रमाणात आहेत. बरेचदा डोळ्यांची तपासणी न केल्यामुळे लोकांना डोळ्यांचा डायबेटिज असतानाही त्यांना त्याची जाणीव नसते. जेव्हा आजार गंभीर रूप धारण करतो तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यासाठी वेळीच डोळ्यांची तपासणी होणं गरजेचं आहे.

    शंकरा आय फाउंडेशन अँड लेबेन केअर यांनी नेत्र नावानी आर्टिफिशियल इंटिलिजन्सवर आधारित यंत्र तयार केलं आहे जे अवघ्या काही मिनिटांतच डोळ्यातील डायबेटिस ओळखू शकतं. रेटिनावर उपचार करणारे डॉक्टर आणि डीप कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्कच्या (DCNN) शास्रज्ञांनी हे नेत्र तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या एआय यंत्रणेत इंटेल झिऑन स्केलेबल प्रोसेसर, डीप लर्निंग बूस्ट आणि इंटेल अडव्हान्स्ड व्हेक्टर एक्सटेंशन ५१२ यांचा वापर केला आहे.

    असं काम करतं यंत्र

    हे तंत्रज्ञान डोळ्यांचा फोटो घेऊन क्लाउड बेस्ड वेब पोर्टलला पाठवतं. तिथं एआय अल्गोरिदमच्या सहाय्याने रुग्णाच्या डोळ्यांच्या फोटोंचं ग्रेडिंग केलं जातं. त्यानंतर रुग्णाला डोळ्यांचा डायबेटिस झाला आहे का, डोळ्यांची क्षमता किती उरली आहे याची माहिती मिळते. त्यानंतर योग्य ते उपचार आपण घेऊ शकता.

    आतापर्यंत या नेत्र (NETRA AI) तंत्रज्ञानाचा वापर करून भारतातील ३०९३ जणांचे डोळे तपासले असून त्यापैकी ७४२ जणांना डायबेटिस होण्याचा धोका असल्याचं लक्षात आलं. या तंत्रामुळे तुम्हाला दोन मिनिटांत तुमच्या डोळ्यांची परिस्थिती लक्षात येते.