
तज्ज्ञांच्या मते, काही खाण्यापिण्यातल्या गोष्टींपासून वास घेण्याची क्षमताही गमावली आणि तोंडाची चवही गेलीये यासारख्या गोष्टी लवकरच दूर करता येतील.
वास घेण्याची क्षमताही गमावलीये आणि तोंडाची चवही गेलीये कोविड-१९ ची ही प्रमुख लक्षणं मानली गेली आहेत. तथापि, आरोग्य तज्ज्ञही म्हणतात हे दोन्ही लक्षणं तापमानातील बदलामुळे येणारा ताप किंवा सर्दीतही सर्वसाधारणपणे आढळून येतात. जर तुम्हालाही यापैकी एखादी समस्या जाणवत असेल तर काही गोष्टींचा अवलंब केल्यास यातून तुमची नक्कीच सुटका होईल. तज्ज्ञांच्या मते, काही खाण्यापिण्यातल्या गोष्टींपासून वास घेण्याची क्षमताही गमावली आणि तोंडाची चवही गेलीये यासारख्या गोष्टी लवकरच दूर करता येतील.
भाजलेली संत्री : Baked orange
व्हिटामीन सीने परिपूर्ण संत्री आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेसाठी फारच उपयोगी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? आपली वास घेण्याची क्षमताही यामुळे वाढविता येऊ शकते. वास घेण्याची क्षमता गमवण्याच्या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठीचा हा जमैकाचा उपाय आहे. हा उपाय सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच व्हायल झाला आहे.तथापि हा उपाय अमंलात आणण्यापूर्वी एकदा डॉक्टचा सल्ला आवश्य घ्यावा.
लसूण : Garlic
लसणात मोठ्या प्रमाणात अँटी व्हायरल आणि प्रतिकारशक्ती वाढविणारी तत्त्वे असतात. लसणाच्या गुणकारी तत्त्वामुंळे आपल्या नसांच्या जवळ येणारी सूज किंवा जळजळची समस्या कमी होण्यास सहाय्यभूत ठरतात. याचा वापर केल्याने माणसाची चव आणि वास घेण्याची क्षमता अधिक सक्षम होण्यास मदत होते. आपण लवंग आणि लसणाचे पाणी गरम करून त्याचे सेवन करू शकता. लिंबाचा रस यात मिसळूनही हे पाणी पिता येईल.
लाल मिर्ची पावडर : Red Chilly Powder
वास घेण्याची क्षमता नाहीशी झाली असेल तर लाल मिर्चीमुळे यात फायदा होऊ शकतो. लाल मिरच्यामध्ये असलेले कॅप्सॅसिन आपल्या वासांच्या संवेदनांचे कार्य सुधारून बंद झालेले नाक उघडण्याचे कार्य करतात. थंडीच्या दिवसांत याचा निश्चितच फायदा होतो. याचा वापर करण्यापूर्वी यात एक पाणी किंवा मध जरूर घालावे.
ओवा : Celery
ओवा सर्दी आणि अॅलर्जीशी लढण्यासाठी अतिशय फयदेशीर आहे. हे वासाची क्षमता सुधारून ही शक्ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करते. वास घेण्याची गमावलेली क्षमता आणि तोंडाची गेलेली चव यांचा समूळ नायनाट करण्यासाठी एक चमचा ओवा एखाद्या कपड्यात बांधा आणि दीर्घ श्वास घेत याचा वास घेत राहा. ही कृती दिवसातून अनेकदा करा. आपली ही समस्या लवकरच दूर होण्यास मदत होईल.
एरंडाचे तेल : Castor oil
काही गुणकारी तत्त्वांनी परिपूर्ण असे एरंडाचे तेल सायनसमुळे होणाऱ्या वेदना आणि अॅलर्जीत फायदेशीर ठरते. सर्दीत वास घेण्याची क्षमता गायब झाल्यावर याचा वापर करतात. ठणठणीत बरं होण्याच्या काळात याचा सातत्याने वापर केल्यास याचे परिणाम लवकर दिसून येतील. एरंडाच्या तेलाचा एकच थेंब आपल्या नाकात टाका आणि दीर्घ श्वास घ्या.