असा असावा कोरोना रूग्णांचा आहार, सकाळी उठल्यापासून रात्री झोपतेपर्यंत जेवणात या गोष्टींचा समावेश झालाच पाहिजे!

कोरोना विषाणू संसर्गामध्‍ये रुग्‍णाची प्रतिकार शक्‍ती कमी होत असते. त्‍यामुळे शरीराला पोषक असाच आहार असावा. याकाळात पॅकबंद स्‍नॅक्‍स, चिप्‍स, बेकरी पदार्थ, फास्‍ट फूड खाणे टाळावे.

  कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढलं आहे. देसभराच दररोज हजारो रूग्ण वाढत आहेत. प्रतिबंधात्‍मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी, संतुलित आहार आणि व्‍यायाम यामुळेच कोरोनावर मात करता येते. योग्‍य आहार हाच प्रतिकारशक्‍ती वाढविण्‍याचे काम करतो. त्‍यामुळेच कोरोना लागण झालेल्‍या रुग्‍णांना देण्‍यात येणारा संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. संतुलित आहार कसा असावा आणि रुग्‍णांनी कोणत्‍या गोष्‍टी टाळाव्‍यात, याबाबत डॉक्टरांनी दिलेली ही माहिती तुमच्या उपयोगी पडेल.

  avoid fruits after meal
  जेवणानंतर लगेच फळे खाऊ नये …
  जेवणानंतर लगेच फळांचे सेवन केल्यास खाल्लेले अन्न अन्ननलिकेत अडकुन बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण सेवन केलेले अन्न व्यवस्थितरित्या आपल्या शरिराच्या आत पोहचत नाही. या कारणामुळे आपली तब्येत खराब होवून आपण खालेले अन्न आतमध्येच सडु शकते. त्यासाठी जेवणाच्या एक तास आधी अथवा जेवनानंतर एका तासाने फ़ळाचे सेवन करणे आपल्या शरिरासाठी योग्य ठरू शकते. महत्वाचे म्हणजे रिकाम्यापोटी जर फळांचे सेवन केल्यास दिवसाची सुरूवात करण्यासाठी आवश्यक असणारी योग्य ती ऊर्जा शरीरास मिळण्यास मदतशीर ठरू शकते.

  सकाळचा नाष्टा आवश्यक

  सकाळचा नाष्टा गरजेचा आहे. यामध्‍ये पारंपरिक पौष्‍टीक नाष्‍टा जसे शिरा, पोहे,  उप्‍पीट आदींचा समावेश असावा. त्‍याचबरोबर सकाळच्या नाष्ट्यात फळे,  दूध, अंडी यांचाही समावेश असल्यास प्रतिकार शक्‍ती वाढण्‍यास मदत होते.

  दुपारच्या जेवणात सकस आहार महत्त्वाचा

  दुपारच्‍या जेवणात पोळी, पालेभाजी, फळभाजी, भात-वरण, आमटी असा संपूर्ण आहार असणं महत्त्वाच आहे. यामध्‍ये मोड आलेली धान्‍याचाही समावेश करावा. यामध्‍ये प्रथिने आणि झिंक असल्‍याने यामुळेही प्रतिकार शक्‍ती वाढते. त्याचबरोबर गाजर, काकडी, बीट, मुळा अशा सॅलेडचाही वापर करावा. सायंकाळी केळ, नारळ पाणी घ्‍यावे.  दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी आवश्‍यक आहे. सकारात्‍मक मानसिकतेसाठी व्‍यायाम आवश्‍यकच आहे.

  या गोष्टी टाळा

  कोरोना विषाणू संसर्गामध्‍ये रुग्‍णाची प्रतिकार शक्‍ती कमी होत असते. त्‍यामुळे शरीराला पोषक असाच आहार असावा. याकाळात पॅकबंद स्‍नॅक्‍स, चिप्‍स, बेकरी पदार्थ, फास्‍ट फूड खाणे टाळावे. अलिकडे अजिनोमोटो यांचा वापर वाढला आहे,  याचा आरोग्‍यावर विपरित परिणाम होतो. त्‍यामुळे याचाही वापर टाळावा.

  yoga girl

  कार्बोनेटेड सॉफ्‍ट ड्रिंक्‍स याचाही वापर करु नये. त्‍याऐवजी कैरीचे पन्‍हे, आवळा आणि लिंबू सरबत यामध्‍ये मुबलक व्‍हिटॅमिन सी असते. यामुळे प्रतिकार शक्‍ती वाढण्‍यास मदत होते. त्‍याचबरोबर टरबूज, खरबूज, कलिंगड या फळांचा रस, सरबत घ्‍यावा, यामध्‍ये भरपूर कॅल्‍शियम, पोटॅशियम व कॅलरी असते. याचा आहारात समावेश करावा.