भिंतींच्या फटींमुळे काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो : पावसामुळे वेगाने वाढू शकतो काळ्या बुरशीचा संसर्ग, घरात हवा खेळती ठेवा, या उपायांचा अवलंब करून ओलावा वाढण्यापासून मुक्ती मिळवा

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसासह हंगामातील ओलावाही वाढला आहे. गुरुवारी आर्द्रतेने ९० टक्क्यांहून अधिक पल्ला गाठला आहे. पावसामुळे घरांमध्ये ओलसरपणा झिरपण्याची समस्या निर्माण झाली आहे. घरांमध्ये वाढलेली आर्द्रता देखील काळ्या बुरशीचा धोका वाढवते. जरी काळी बुरशी उन्हाळ्यात येत असली तरी, पावसाच्या आर्द्रतेत ती लवकर पसरते.

  घरात काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला असल्यास तो असा ओळखा

  काळी बुरशी ओल असलेल्या ठिकाणी वेगाने पसरते. भिंतीवर काळी बुरशी पसरली असल्यास त्यातून कुबट वास येऊ लागतो. किचनमध्ये खूप दिवसांपासून ठेवलेले ब्रेड किंवा सडलेली फळे, भाज्या आणि फ्रीजमध्ये काळी बुरशी होण्याचे प्रमाण अधिक असते. यामध्ये घरात असलेली ओल भिंतीवर पसरते. ता एयर डक, खिडक्यांच्या आसपासची जागा, बाथरुम आणि किचनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

  तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या पावसासह हंगामातील ओलावाही वाढला आहे. गुरुवारी आर्द्रतेने ९० टक्क्यांहून अधिक पल्ला गाठला आहे. पावसामुळे घरांमध्ये ओलसरपणा ओसरण्याची समस्या निर्माण झाली आहे. घरांमध्ये वाढलेली आर्द्रता देखील काळ्या बुरशीचा धोका वाढवते. जरी काळी बुरशी उन्हाळ्यात येत असली तरी, पावसाच्या आर्द्रतेत ती लवकर पसरते.

  दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात की, बुरशी हवेमध्ये वाढत असते. झाडाच्या खोडावर आणि काळ्या स्वरूपात आपण ब्रेडवर हे पाहत आलो आहोत. ही बुरशी आपल्या नाकातून शोषली जाते आणि आपल्या नाकाच्या त्वचेत जाते. यानंतर, हा रोग खूप वेगाने पसरतो आणि सर्वकाही बिघडवितो आणि मेंदूत जातो. यात मृत्यूचा दर ५० टक्के आहे.

  कोरोनामधून बरे झालेल्या लोकांना या ओलाव्यापासून बचाव करण्याची अधिक गरज आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मास्क वापरण्यापासून ते ऑक्सिजन सिलिंडरच्या वापरावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

  पुढील उपायांच्या मदतीने भिंतीवर आलेल्या काळ्या बुरशीपासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता

  ओलाव्याची कारणे शोधा

  भिंतींवर असलेले ओलाव्याचे डाग याचाच संकेत असतो की, कुठूनतरी पाणी झिरपते आहे. त्या ठिकाणी रंग फुगलेला नाही ना हे पाहावे. त्यानंतर पाणी कुठून येत आहे हे तपासावे. याचे कारण पाण्याचा फुटलेला पाईप किंवा तुटलेली फरशीही असू शकते. अशातच या गोष्टी रिपेअर करून घ्या.

  क्रॉस व्हेंटिलेशन

  घराच्या दरवाजे-खिडक्या उघड्या ठेऊन ताजी हवा घरात येऊ द्या. घरातील ओल बाहेर काढण्यासाठी घरात क्रॉस व्हेंटिलेशन असणे आवश्यक आहे. घरात हवा सहज खेळती राहते. घरातील फर्निचर भिंतींना टेकून ठेऊ नका. भिंत आणि फर्निचर या दोहोंमध्ये हवा खेळती राहण्यासाठी थोडे अंतर ठेवा.

  बाहेरील भिंतींना वॉटरप्रूफ रंग द्या

  तज्ज्ञांच्या मते, घराच्या बाहेरील भिंतीना चांगल्या दर्जाचा वॉटरप्रूफ रंग द्या. या रंगाचे भिंतीवर कमीत कमी दोन कोट किंवा कंपनीने निर्देशित केलेल्या पद्धतीनुसार रंग द्यावा. रंगाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यात पाण्याचा अधिकाधिक वापर टाळा. यामुळे रंगाची गुणवत्ता घसरण्याची दाट शक्यता आहे.

  जोडलेले सांधे तपासा

  जर तुमच्या घरातील भिंतींच्या जोडलेल्या सांध्यांना तडे गेले असल्यास त्याची पाहणी करा. रंगकाम करण्यापूर्वी त्या सांध्यांमध्ये चांगल्या दर्जाचे सिमेंट किंवा पुट्टी वापरुन त्यांना पडलेल्या भेगा बुजवाव्यात. घराचे बांधकाम करताना विटा आणि कॉलममध्ये अनेकदा भेगा पडतात. हे भरण्यासाठी तज्ज्ञ मॅश किंवा वेल्वेट मॅश वापरण्याचा सल्ला देतात.

  डिह्युमिडिफायर

  आर्द्रता आणि बुरशीला कारण ठरणारी हवा ही मशीन शोषून घेते. वेगवेगळ्या रुममध्ये पोर्टेबल किंवा छोट्या डिह्युमिडिफायरचा उपयोग करता येऊ शकतो.

  घराच्या आसपासच्या परिसराचे काँक्रिटीकरण करा

  घराच्या आसपासच्या जमिनीचे एक ते दीड मीटरपर्यंत काँक्रिटीकरण करण्याचा सल्ला तज्ज्ञ सल्ला देतात. यामुळे पावसाचे पाणी बांधकामाच्या पायापर्यंत पोहोचत नाही. याशिवाय घराचे बांधकाम करताना बोल्डर्स आणि फ्लाय ॲश विटांचा वापरही करू शकता. कारण मातीच्या विटा पाणी शोषून घेतात.

  घरी काळ्या बुरशीची तपासणी करताना घ्या ही खबरदारी

  कोणत्याही प्रकारच्या बुरशीची तपासणी करताना मास्क, हातमोजे आणि सेफ्टी गॉगल वापरा. तपासणी केल्यानंतर, मास्क, हातमोजे आणि सेफ्टी गॉगल पूर्णपणे स्वच्छ करा. जर बुरशीचे प्रमाण जास्त असेल तर ते काढून टाकण्यासाठी एखाद्या व्यावसायिकाची मदत घ्या.

  घरातील या वस्तूंचाही ओलाव्यापासून बचाव करा

  कपड्यांच्या कपाटात कापराच्या गोळ्या ठेवा

  सावली असल्या कारणाने या वातावरणात कपडे पूर्णपणे सुकत नाहीत. यामुळे कपड्यांना कुबट वास येतो. यापासून बचाव करायचा असल्यास कपड्यांच्या कपाटात कापराच्या गोळ्या ठेवाव्यात.

  रॉकेलने फर्निचर साफ करा

  आर्द्रतेमुळे कीड लागणे आणि बुरशी होणे ही सामान्य लक्षणे दिसून येतात. यामुळे दर आठवड्याला रॉकेलने फर्निचर साफ करा. कुठे बाहेर जाणार असाल तर फर्निचर प्लास्टिक कव्हरने झाकून घ्या. त्यामुळे त्यात ओलावा राहणार नाही. जर पाण्याने लाकूड फुगले असेल तर त्यावर एसिटोनचा वापर करा. हे आर्द्रता शोषून घेते. लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी सुक्या कपड्याचाच वापर करा.

  शू रॅकमध्ये लावा बल्ब

  वेळोवेळी बूट-चपलांच्या कपाटाची स्वच्छता करत राहा, कारण बूट-चप्पल मोठ्या प्रमाणात आर्द्रता शोषून घेतात. रॅक मध्ये कमी व्होल्टेजचा बल्ब लावा. कारण त्यातून निघणारी गर्मी बूट-चप्पलमधील आर्द्रता शोषून घेते.

  पडदे आणि कार्पेटचे ओलाव्यापासून रक्षण करा

  पावसाळ्यात कार्पेट वापरू नका. आपण वापरत असल्यास ते कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या कार्पेटवर धूळ आणि घाण असल्यास, ब्रशने पुसून टाका. ओलावा पडद्यावरही बुरशीचे कारण बनू शकते, म्हणून जर पडदे ओले झाले तर ते धुऊन आणि उन्हात वाळवल्यानंतरच पुन्हा वापरा.

  Cracks in the walls can increase the incidence of black fungus Rain can increase the incidence of black fungus infection Keep the air in the house fresh