rashi bhavishya

मेष – कामात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी आदराचं स्थान मिळेल. अनेक दिवसांपासूनची अडलेली कामं पूर्ण होतील. अविवाहितांना विवाहप्रस्ताव येतील. 

वृषभ- अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातील नातेसंबंध आणखी दृढ होतील. नव्या संधी मिळतील. दिवस उत्साहवर्धक असेल. अडचणी दूर होतील. 

मिथुन- दैनंदिन कामांमध्ये काही अडचणी येतील. पण, त्यावर मात करण्याचं बळ तुम्हाला मिळणार आहे. अतिघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. 

 
कर्क- अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. आजचा दिवस तुमच्यासाठी बऱ्याच संधी आणि भाग्योदयही घेऊन आला आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. 

 
सिंह – कामाचा व्याप वाढलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांची मदत होणार आहे. तुमच्या अडचणी सहजपणे दूर होतील. 

कन्या- कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या ठिकाणी नवे करार होतील. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल. आज तुमच्यासोबत काम करणाऱ्यांवर तुमचा प्रभाव असेल. 

तुळ- नोकरी आणि व्यवसायात लाभ होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्योदयाची संधी घेऊन आला आहे. भावनांवर मात्र नियंत्रण ठेवा.

वृश्चिक – व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. एखाद्या नव्या कामाची सुरुवात कराल. अविवाहितांसाठी प्रेम प्रस्ताव येतील.

धनु- दैनंदिन कामं पूर्ण कराल. आर्खित परिस्थिती सुधारेल. प्रेमसंबंधांसाठी आजता दिवस चांगला आहे. जेवणात मसालेदार पदार्थांचा वापर टाळा.

मकर- आज कोणतेही नवे करार करु नका. वादांमध्ये अडकू शकता. पण, त्यातून बाहेर पडण्यासाठीसुद्धा काही मार्ग मिळणार आहेत.

कुंभ- व्यापार वाढवण्याचा विचार आज नको. पैसे खर्च करताना काळजी घ्या. दिवस काहीसा थकवणारा असेल. 

मीन- आर्थिक चणचण कमी होणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिक जोमानं सर्व कामं पूर्णत्वास न्याल. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे.