rashi bhavishya

मेष – तुमच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक करण्याची उमेद आहे. अधिक मेहनत करा यश अटळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील.

वृषभ –  नवीन काम  सुरू करण्याचा विचार कराल. संपत्तीच्या कामांवर लक्ष द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नवीन गोष्टी करण्यासाठी वरिष्ठांकडून सल्ला घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन – वैयक्तीक जीवनात गैरसमज निर्माण होतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. अधिक मेहनत करण्याची गरज आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क – आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.

सिंह – लहान गोष्टीतून सकारात्मक, फायद्याची गोष्ट घडू शकते. उत्साही राहाल. उत्साहाच्या भरात निर्णय घेऊ नका, विचार करुनच पुढे जा. तब्येत चांगली राहील. इतरांचा सल्ला घ्या.

कन्या – कालांतराने सर्व गोष्टी मार्गी लागतील. फक्त योग्य वेळेचा विचार करा. लवकरच ती वेळ तुमच्या जीवनात येणार आहे. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहा. आज कसलाही बेत करू नका.

तूळ- आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल. 

वृश्चिक- नोकरीत एखादा सन्मान मिळेल. विचार करत असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. यश मिळेल. मोठं टेन्शन कमी होऊ शकतं. सकारात्मक राहा.

धनु- महत्त्वपूर्ण व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. नाती आणि नातेवाईक जपा. काही प्रश्न पुढे उपस्थित राहतील. त्यावरचं उत्तर शोधून आयुष्याच्या चक्राला गती द्या.

मकर- व्यापार आणि नोकरीत फायदा होणार आहे. गुंतवणुकीचा फायदा होईल. करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. आयुष्यात आनंददायी घटनांची रांग लागणार आहे.

कुंभ- आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडतील. जास्त विचार करु नका. गोष्टी ओघाओघाने घडू द्या, फायदा होईल. प्रेमसंबंधामंध्ये यश मिळेल. 

मीन- अधिक जबाबदारीचं काम मिळेल. नव्या कामांमध्ये यश मिळेल. इतरांच्या मदतीनं तुम्हाला आनंद मिळेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील.