rashi bhavishya

मेष- गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला नशिबाची साथ मिळत आहे. आजही ती मिळेल. समस्यांवर तोडगा काढा आणि त्या मार्गी लावा. अडचणींवर मात करता येण्याची तुमची क्षमता आज इतरांसाठी फायद्याची ठरेल.

वृषभ- एखाद्या गोष्टीची अपेक्षा असल्यास आज ती गोष्ट सहजपणे तुमच्यापर्यंत येणार आहे. पण, या संधीचा दुरुपयोग करु नका. स्वत:ची वाट शोधण्यासाठीच या संधीचा वापर करा.

मिथुन- सर्व निर्णय़ आपल्या बळावर घेतल्याची समाधानाची भावना आजचा दिवस आनंदी करणार आहे. तुम्ही खुप काही करु शकता. पण, आजच्या या क्षणी .काही ठराविक गोष्टींवरल केंद्रीत राहा.

कर्क- योग्य निर्णय घेण्याच्या दिशेने आज वाटचाल कराल. एकादा मोठा निर्णय घेण्याची संधी मिळेल. सावधगिरी बाळगा. कोणाला मदतीची गरज वाटल्यास त्यांची मदत करा.

 सिंह- कोणतीही माहिती तुमच्यापर्यंतच न ठेवता ती इतरांपर्यंत पोहोचवा. आज निर्णय स्वत: घेण्यापूर्वी त्याविषयी इतरांशी चर्चा जरुर करा.

कन्या- तुमच्या मनात खुप गोष्टींनी घर केलेलं आहे. सध्या तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रतिक्षेत आहात त्या व्यक्तीचा प्रवेश जीवनात अखेर होणार आहे. अनपेक्षित घटनांसाठी तयार राहा. जास्त ताण न घेण्याचा प्रयत्न करा.

तुळ- आज बहुतांश बाबतीत चिंतामुक्त व्हाल. बऱ्याच कालावधीनंतर आवडीच्या व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. नवे विचार जीवन व्यापतीस. सुखाची अनुभूती देतील.

वृश्चिक- आज कोणतंही संकट स्वीकारण्यापूर्वी विचार करा. नव्या संकटांसाठी आजचा दिवस चांगला नाही. आश्चर्यचकित होण्यापेक्षा प्रसंगांविषयी विचार करण्याचा प्रयत्न करा. 

धनु- वयाने लहानांचे सल्लेही आज फायद्याचे ठरणार आहेत. समस्यांवर अगदी सहज मार्ग निघेल. नव्या विश्वात प्रवेश करण्यात तयार राहा. 

मकर- आज इतरांना समजून घेण्यात काही अंशी अडचणी येतील. त्यामुळे अर्थातच मतभेदही वाढतील. पण, संयम ठेवा हा काळही निघून जाईल.

कुंभ- आजूबाजूच्या परिस्थितीमुळे चिंतातूर होऊ नका. इतरांप्रती आदराची भावना ठेवा. आजचा दिवस शुभ असेल. 

मीन- विरोधकांपासून सावध रहा . आज खऱ्या मित्रांची मदत होणार आहे. इतरांनाही तुमची चिंता आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही.