दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; नाहीतर तुमच्या शरीराचे होतील अतोनात हाल

फक्त मुलेच नाही, तर प्रत्येक वयाच्या लोकांसाठी दूध अत्यंत फायदेशीर ठरते. मग ती महिला असो किंवा पुरुष, सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूधाच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांबाबत आपण सर्वजण जाणतोच पण दुधाच्या सोबत काही पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

  सर्वांना ठाऊक आहेच की, दूध प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कारण यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, आयोडिन, पोटॅशियम, व्हिटामिन डी आणि फॉस्फरस इत्यादी घटकांचा समावेश असतो, जे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहेत. दूध हा एक परिपूर्ण आहार समजला जातो.

  फक्त मुलेच नाही, तर प्रत्येक वयाच्या लोकांसाठी दूध अत्यंत फायदेशीर ठरते. मग ती महिला असो किंवा पुरुष, सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूधाच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांबाबत आपण सर्वजण जाणतोच पण दुधाच्या सोबत काही पदार्थांचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊयात अशाच काही पदार्थांबाबत…

  असं म्हणतात की, दूध पिण्याआधी किंवा त्यानंतर आंबट फळांचे सेवन करू नये. असे केल्याने आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे पोटदुखी, त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकतात.

  अनेकांना वाटतं की, दूधापासून तयार झालेले दही जर दुधासोबत सेवन केल्याने काही नुकसान होत नाही. पण, या भ्रमात राहू नका. दही आणि दुधाचे एकत्र सेवन कधीही करू नये.

  असं म्हणतात की, उडदाच्या डाळीसोबत दुधाचे सेवन चुकूनही करू नये. असं केल्याने आपल्याला पोट आणि आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

  असंही म्हणतात की, दुधासोबत लिंबू,फणस, कारले इत्यादींचे, एकत्र सेवन कधीच करायला नको, असे केल्याने गजकर्ण, खाज, सोरायसिस इत्यादी होण्याची शक्यता बळावते.

  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दुधासोबत फळांचे सेवन केल्याने दुधात असलेले कॅल्शियम फळांमधील अनेक घटक स्वत: शोषून घेतो आणि त्यांचे पोषण शरीराला मिळत नाही, विशेषत: संत्री आणि अननस सारखी आंबट फळे दुधासोबत कधीही सेवन करू नयेत.

  असंही म्हणतात की, दुधासोबत कधीच मासळी खाऊ नये. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊनच दूध सेवन करा.