कुर्ती निवडतांना टाळा ‘या’ चुका

 तुम्ही ऑफिसपासून ते सहल किंवा एखाद्या कार्यक्रमनपर्यंत कुठेही घालायला  कुर्ती हा पर्याय सोयीस्कर आहे. प्रत्येक तरुणी ती मग लठ्ठ असो वा सडपातळ. कुणावरही कुर्ती शोभून दिसते. पण कुर्ती परिधान करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर तुम्ही कुर्ती परिधान करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर मग मात्र सुंदर कुर्तीतसुद्धा तुम्ही लठ्ठ दिसू शकता.

कुर्तीसाठी लेगिंग्स हा उत्तम पर्याय असतो. मात्र लेगिंग्ससोबत शॉर्ट कुर्ती शोभून दिसत नाही. यामुळे तुमचे बट्स हेवी दिसू शकतात. तसेच  पटियालासोबत तुम्ही शॉर्ट कुर्ती परिधान करायला हवी. तर लेगिंग्ससोबत सामान्य उंचीची कुर्ती निवडावी.

अनेकदा सैल कुर्तीत आपण सडपातळ दिसू असा अनेकींचा समज असतो. पण असे मुळीच नसते. सैल कुर्तीत तुम्ही अधिक लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे आपल्या साइजनुसारच कुर्तीची निवड करा.

कुर्ती निवडताना त्याच्या फेब्रिकची योग्य निवड करणे गरजेचे आहे. लाइक्रा आणि जर्सी फेब्रिक्सऐवजी कॉटन फेब्रिकची निवड कधीही योग्य.

केवळ कुर्तीच नव्हे तर त्याचे स्लीव्जसुद्धा तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार असणे गरजेचे आहे. जर तुमचे दंड जाड असतील, तर तुम्ही केप स्लीव्जची निवड करु शकता. योग्य फिटिंग अर्थातच ¾ स्लीव्ज तुम्हाला शोभून दिसू शकतील. जर स्लीवलेस कुर्ती तुम्ही परिधान करु इच्छित असाल, तर V-neck कुर्ती निवडा.

कलर्ससुद्धा तुमच्या कुर्तीचा लूक बिघडवू शकतात. जर तुम्ही लठ्ठ असाल, तर भडक रंगामध्ये तुम्ही आणखीनच जास्त लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे असे रंग निवडू नका. जर तुम्हाला भडक रंगच हवा असेल तर त्यात  प्रिंटेड कुर्तीची निवड करा.