Does having sex with your wife affect your sexual fantasy nrvb
पत्नीसोबत सेक्स करताना तिच्या मैत्रिणीबाबत विचार आल्यास Sexual Fantasy चा परिणाम होतो का?

मानवी मेंदू ही एक विचित्र गोष्ट आहे. सेक्शुअल फॅन्टसी (Sexual Fantasy) या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. वास्तविक जीवनात आपण सामाजिक नियम, व्यावहारिक बंधनं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना बांधील आहोत. पण आपल्या कल्पनेच्या दुनियेत आपण स्वतंत्र आणि स्वच्छंदी असून कोणताही विचार करू शकतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस घड्याळाच्या प्रमाणे नुसता धावत सुटलाय. त्याला या धकाधकीत आपल्या शारीरिक गरजाचंही अनेकदा भान रहात नाही आणि मग निर्माण होते ती गुंतागुंत. मग तो सल्लागाराच्या शोधात निघतो आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो. असाच एक प्रश्न सध्या समोर आला आहे तो सेक्शुअल फॅन्टसीचा.

माझ्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवताना माझ्या मनात तिच्या मैत्रिणींचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा विचार येतो. माझ्या या सेक्शुअल फॅन्टसीविषयी (Sexual Fantasy) मी तिला कल्पना दिली आहे. शरीरसंबंधाच्या वेळी ती या गोष्टी अतिश खेळकरपणानं घेते. पण नंतर ती मला यावरून चिडवते आणि मला अपराधी असल्यासारखं वाटतं. पण मी त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. या गोष्टींचा माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मानसिकतेवर कोणता परिणाम होणार नाही ना?

तज्ज्ञांच्या मते, ही गोष्ट खरंतर खूप सामान्य आहे. अनेकजण आपल्या पार्टनरबरोबर शरीरसंबंधाच्या वेळी इतर व्यक्तींचा विचार करत असतात. तुमच्या आणि तुमच्या पत्नीमध्ये अशा पद्धतीने प्रामाणिक, खुले आणि नॉन जजमेंटल संभाषण होतं. यामुळे तुम्हाला याची काहीच काळजी करण्याची गरज नाही. आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी या सर्व गोष्टींची गरज असते. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या पत्नीचे नाते खूपच मोकळे असल्याने तुम्हाला याची चिंता करण्याचे कारणच नाही.

मानवी मेंदू ही एक विचित्र गोष्ट आहे. सेक्शुअल फॅन्टसी या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. वास्तविक जीवनात आपण सामाजिक नियम, व्यावहारिक बंधनं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना बांधील आहोत. पण आपल्या कल्पनेच्या दुनियेत आपण स्वतंत्र आणि स्वच्छंदी असून कोणताही विचार करू शकतो.

त्याचबरोबर आपल्या सेक्शुअल फॅन्टसीविषयी विचार करून त्याचा आनंद घेऊ शकतो. या गोष्टींमधून एखाद्यास लैंगिक आनंद मिळू शकतो तर एखाद्यास ते घृणास्पद वाटू शकतं. पण ही गोष्ट नाकारणं घातक ठरू शकतं. त्यामुळे तुमची पत्नी या गोष्टींमध्ये तुमच्याबरोबर असून यामधून तुम्हा दोघांनाही लैंगिक आनंद आणि तुमचं नातं आणखी घट्ट होऊ शकतं.

तुमच्या पत्नीमध्ये आणि तुमच्यात याविषयी खुलेपणानं आणि प्रामाणिकपणानं चर्चा होत असल्याने याविषयी तुमच्या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही कल्पना करणं तुमच्या आणि पत्नीमधील शरीरसंबंधांवेळी मजेशीर गोष्ट आहे. पण सतत यासंबंधी पत्नीशी बोलून तिला याविषयी काही अडचण आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहा. यामुळे तुमच्या नात्यातील प्रामाणिकता टिकून राहील. त्याचबरोबर तिच्या विचारांचा आदर करून तिनं ठरवून दिलेली रेषा ओलांडू नका.

सेक्शुअल फँटसी (Sexual Fantasy) हा खरंतर आपला लैंगिक आनंद वाढवण्यासाठी आणि तुम्हाला यामध्ये अधिक आनंद देण्यासाठी आहे. फक्त आपल्याकडेच अशा कल्पनांचा अर्थ असा लावला जातो की, अशा कल्पना तुमच्या मनात येतात म्हणजे तुम्ही तसं वागाल. पण तसं होत नाही. कल्पनेतच त्याचा आनंद असतो माणूस लगेच तशी कृती करत नाही.त्यामुळे कल्पना आणि प्रत्यक्षात कृती करणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

दरम्यान तुम्हाला तरीदेखील याविषयी वाईट भावना वाटत असेल तर पत्नीबरोबर याविषयावर दीर्घ चर्चा करा. तिचं याविषयीचे मत ऐकून घ्या. तुमची मतंदेखील तिच्यासमोर मांडा आणि तिच्या मतांचा आदर करून निर्णय घ्यायला हवा मग प्रश्न औषधालाही उरणार नाही.