थंडीमुळे गाढवांना घातला पायजमा!

दुसर्‍या महायुद्धापूर्वी ही गाढवं वर्षाला सुमारे तीस हजार या संख्येने निर्यात केली जात असत. नंतर ही संख्या रोडावली. बेटावरही त्यांची संख्या अतिशय खालावली होती.

पॅरीस. फ्रान्सच्या रिया नावाच्या बेटावर अनेक लोक केवळ निसर्गसौंदर्य पाहण्यासाठीच येतात असे नाही. काही बेटं सापांसाठी, काही मांजरांसाठी आणि काही लाल खेकड्यांसाठी जशी प्रसिद्ध आहेत, तसेच हे बेट गाढवांसाठी प्रसिद्ध आहे. या बेटावर पोडतौ प्रजातीची गाढवं आहेत. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात या गाढवांना ‘कॅडेनेट’ नावाचे पायजमे घातले जातात!

या पोडतौ गाढवांचा आकार आणि त्यांची ताकत मोठीच असते. त्यामुळे त्यांचा वापर चेरेंते मेरिटाइम नावाचे मीठ काढण्यासाठी दलदलीत उतरवले जाते. या दलदलींमध्ये डास आणि अन्य कीटकांचा सुळसुळाट असतो, पण त्यांना ही गाढवं भीक घालत नाहीत. अशा ताकतवान गाढवांनाही त्यांचे मालक प्रेमाने हे पायजमे घालतात. दुसर्‍या महायुद्धापूर्वी ही गाढवं वर्षाला सुमारे तीस हजार या संख्येने निर्यात केली जात असत. नंतर ही संख्या रोडावली. बेटावरही त्यांची संख्या अतिशय खालावली होती. १९७७ मध्ये तर अशी ४४ गाढवंच शिल्लक राहिली होती. त्यामुळे त्यांना कायद्याने संरक्षण देण्यात आले. आता त्यांची संख्या ४५० वर पोहोचली आहे.