आता बॉसची भीती दाखवून प्रेयसी प्रियकराला करतेय BlackMail कारण भाईने लॉकडाऊन मध्ये केलेत नकोसे उद्योग

लॉकडाऊनमध्ये घरातच असल्या कारणाने त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं. मात्र एके दिवशी त्याच्या प्रेयसीने ते व्हिडिओ पाहिले आणि तिने ते व्हिडिओ रेकॉर्ड केले. आता प्रेयसी ते व्हिडिओ तरुणाच्या बॉसला पाठविण्याची धमकी देत आहे.

  लंडन : प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्यांवर जगात अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. प्रेमावर तर कविता, गीत आणि कादंबऱ्याही लिहिण्यात आल्या आहेत. त्यातही Love at first sight बद्दल तर काही विचारू नका. मात्र सर्वांनाच खरं प्रेम मिळतचं असं नाही. काहींना तर प्रेमात धोकाही खावा लागतो. बरं ही वेळ कोणाच्याही आयुष्यात कधीही येऊ शकते. अनेकदा परिस्थिती इतकी बिकट होते की नेमकं काय करावं, हे कळतदेखील नाही.

  गे साइटवर शेअर केला व्हिडिओ

  द सनमध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार हैराण करणारं हे वृत्त ब्रिटनमध्ये घडलं आहे. अशी माहिती न्यूज १८ लोकमत डॉटकॉमने दिली आहे. येथे एका प्रियकराने लॉकडाऊनदरम्यान (Lockdown) आपले काही व्हिडिओ गे साइटवर अपलोड केले होते. लॉकडाऊनमध्ये घरातच असल्या कारणाने त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं. मात्र एके दिवशी त्याच्या प्रेयसीने ते व्हिडिओ पाहिले आणि तिने ते व्हिडिओ रेकॉर्ड केले. आता प्रेयसी ते व्हिडिओ तरुणाच्या बॉसला पाठविण्याची धमकी देत आहे.

  त्रस्त झालेल्या प्रियकराने जेव्हा याबाबत एका कन्स्ल्टंटकडे मदत मागितली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. दिलेल्या वृत्तानुसार, प्रियकर म्हणाला की, मी २६ वर्षांचा आहे आणि माझी प्रेयसी २४ वर्षांची. जेव्हा तिने पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहिले तेव्हा ती चिडली होती. मी ते साइटवरुन हटविण्याआधीच तिने सर्व व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतले आणि आपल्या भावांना पाठवले. मी या कृत्यासाठी तिची माफीदेखील मागितली.

  आता सल्लागाराने प्रियकराला न घाबरता परिस्थितीशी दोन हात करण्याचा सल्ला दिला आहे. एक्सपर्ट म्हणाला की, तुमच्या प्रेयसीने (Girlfriend) परवानगीशिवाय व्हिडिओ शेअर केले होते. त्यामुळे यात तिचीच चूक आहे. हा कायदेशीर गुन्हा आहे. कोणाचेही खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देणं गुन्हा आहे. त्यामुळे तुम्ही तिची समजूत काढा. जर ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती भविष्यात तुला त्रास होईल असं वागणार नाही. त्यामुळे शेवटी त्याने तिच्यासोबतचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला.

  during lockdown lover uploads private videos to gay sites now girlfriend threatened to send video to mans boss