भाजलेले चणे खाल्याने बुद्धी होते आणखी तल्लख; जाणून घ्या असेही आहेत फायदे

भाजलेल्या चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटिन, कॅल्शियम आणि लोह सोबतच व्हिटामीनही मुबलक प्रमाणात असते. याशिवाय फायबरही मोठ्या प्रमाणात असते जे पचनक्रिया उत्तम राखण्यास मदत करते. याच्या सेवनाने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि सोबतच भूकही शमते. जाणून घेऊयात एवढे गुणकारी चणे सकाळी-सकाळी खाल्ल्याने काय फायदे होऊ शकतात.

    भाजलेले चणे खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते. जर चणे सकाळी-सकाळी खाल्ले तर आपली अनेक आजारातून मुक्तता होऊ शकते. कारण, लो कॅलरीज (Low Calories) असल्या कारणाने याला हेल्दी स्नॅक्सही म्हटले जाते. हे वजन घटविण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. अन्य एखाद्या डायफ्रुटबाबत सांगायचं झालं तर हे सर्वांच्या तुलनेत स्वस्तही असतात.

    भाजलेल्या चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटिन, कॅल्शियम आणि लोह सोबतच व्हिटामीनही मुबलक प्रमाणात असते. याशिवाय फायबरही मोठ्या प्रमाणात असते जे पचनक्रिया उत्तम राखण्यास मदत करते. याच्या सेवनाने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि सोबतच भूकही शमते. जाणून घेऊयात एवढे गुणकारी चणे सकाळी-सकाळी खाल्ल्याने काय फायदे होऊ शकतात :

    • डॉक्टरांच्या मते, गर्भवती महिलांसाठी भाजलेले चणे अत्यंत फायदेशीर असतात. गर्भावस्थेदरम्यान काही महिलांना उलट्या होण्याची समस्या होते. अशात गर्भवती महिलांसाठी भाजलेले चणे किंवा सत्तूचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
    • सर्वसाधारणपणे असं पाहण्यात आलं आहे की, अधिकाधिक महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते. अशातच रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर महिलांनी आपल्या आहारात भाजलेले चण्याचा आवश्य समावेश करावा. ज्यामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते. कारण, याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भासत नाही.
    • तज्ज्ञांच्या मते, भाजलेले चणे खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. सोबतच भाजलेले चणे पाचन शक्तीसाठी अत्यंत फायदेशीर असतात. कारण चण्यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असते, ज्यामुळे चणे शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतात.
    • आहारतज्ज्ञांच्या मते, भाजलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात.

    Eating roasted grams makes the intellect even more brilliant