गावठी चिकन व ब्रॉयलर चिकनबाबत माहित असली पाहिजे अशी तथ्‍ये; २०२५ पर्यंत चिकनचे सेवन व मागणीमध्‍ये ५० टक्‍क्‍यांनी होणार वाढ

अनेक शेतकऱ्यांनी वाढत्‍या मागणीमुळे ब्रॉयलर कृषीच्‍या पद्धतीप्रमाणेच गावठी चिकनला खाऊ घालण्‍यास सुरूवात केली आहे. दोन्‍ही प्रकारच्‍या चिकनमध्‍ये असलेल्‍या मांसांबाबत काही तथ्‍ये: दोन्‍ही चिकनमधील मांस प्रथिनयुक्‍त आहे आणि त्‍यामध्‍ये शरीरासाठी आवश्‍यक जीवनसत्त्वे व मिनरल्‍स असतात.

    मुंबई : चिकनमध्‍ये कमी कॅलरी, उच्‍च प्रमाणात प्रथिन असते, जे सर्व वयोगटातील लोकांना पोषण देते. मागील काही दशकांपासून लोक त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत अधिक जागरूक बनले आहेत आणि वर्षानुवर्षे चिकनसाठी मागणीमध्‍ये वाढ होत आली आहे. काही संशोधनांमधून निदर्शनास येते की, २०२५ पर्यंत चिकनचे सेवन व मागणीमध्‍ये ५० टक्‍क्‍यांनी वाढ होईल.

    ग्राहकांनी नेहमीच ब्रॉयलर चिकन व गावठी चिकनला पसंती दिली आहे. ब्रॉयलर चिकनची विशेषत: त्‍यांच्‍या मांसासाठी वाढ केली जाते आणि त्‍यांना कॉर्न फिड व पौष्टिक सप्‍लीमेण्‍ट्स खाऊ घातले जाते. गावठी चिकन स्‍थानिक जाती म्‍हणून ओळखले जाते आणि ते बहुतांश वेळ बाहेरील वातावरणामध्‍येच व्‍यतित करण्‍यासोबत इतर खाण्‍यासोबत कचरा व जंत सेवन करतात. पण, अलिकडील काळात चिकनचे वाढते सेवन आणि ग्राहक दर्जेदार व चविष्‍ट चिकनला देत असलेल्‍या प्राधान्‍यामुळे पोल्‍ट्री उद्योगामधील कृषी तंत्रांमध्‍ये देखील आमूलाग्र बदल दिसण्‍यात आला आहे.

    अनेक शेतकऱ्यांनी वाढत्‍या मागणीमुळे ब्रॉयलर कृषीच्‍या पद्धतीप्रमाणेच गावठी चिकनला खाऊ घालण्‍यास सुरूवात केली आहे. दोन्‍ही प्रकारच्‍या चिकनमध्‍ये असलेल्‍या मांसांबाबत काही तथ्‍ये: दोन्‍ही चिकनमधील मांस प्रथिनयुक्‍त आहे आणि त्‍यामध्‍ये शरीरासाठी आवश्‍यक जीवनसत्त्वे व मिनरल्‍स असतात.

    ते कोलेस्‍ट्रॉल व रक्‍तदाबाचे नियमन करण्‍यामध्‍ये मदत करतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात. उच्‍च प्रथिनयुक्‍त आहार वजन कमी करण्‍यामध्‍ये प्रभावी असल्‍याचे ओळखले गेले आहे आणि चिकन हे वजन कमी करण्‍यामधील मुख्‍य दावेदार राहिले आहे. गरम चिकन सूपच्‍या सेवनामुळे सामान्‍य सर्दी, तसेच नोक चोंदणे व घसा खवखवणे अशा लक्षणांपासून आराम देखील मिळतो.

    दोन्‍ही चिकनच्‍या सफेद व तपकिरी रंगाच्‍या अंड्यांमध्‍ये समान पौष्टिक मूल्‍य असते. पण, ब्रॉयलर चिकन व सफेद अंडी गावठी चिकन व तपकिरी रंगाच्‍या अंड्यांच्‍या तुलनेत कमी महागडे आहेत. तज्ञांचा सल्‍ला आहे की, मांसामध्‍ये असू शकणारे कोणत्‍याही प्रकारचे जीवाणू नष्‍ट करण्‍यासाठी चिकन उच्‍च तापमानामध्‍ये शिजवा.