सेक्स करता करता त्याचा प्रायव्हेट पार्टच झाला फ्रॅक्चर; दुखापत पाहून डॉक्टरांनाही बसला धक्का

सेक्सदरम्यान या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला होता. पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु तरीही हा पार्ट क्रॅक होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अशा प्रकारच्या केसेसमध्ये फ्रॅक्चर हॉरिझॉन्टल (Horizontal) पद्धतीचे पाहायला मिळत होते. परंतु, ही पहिलीच अशी घटना आहे की ज्यात प्रायव्हेट पार्टला व्हर्टिकल (Vertical) फ्रॅक्चर झाले आहे.

  ब्रिटन : सेक्स (Sex) करताना प्रायव्हेट पार्टला (Private Part) थोडीशी दुखापत, समस्या होते, वेदनाही होतात. पण एका व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट सेक्स करता करता फ्रॅक्चर (Fracture) झाला आहे आणि तो असा फ्रॅक्चर झाला आहे, ही पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. प्रायव्हेट पार्ट अशा पद्धतीने फ्रॅक्चर होण्याची ही पहिलीच घटना असावी, असं सांगितलं जातं आहे.

  ब्रिटनमधील ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टची विचित्र केस पाहून डॉक्टरदेखील चक्रावून गेले आहेत. सेक्सदरम्यान या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला होता. पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु तरीही हा पार्ट क्रॅक होण्याची शक्यता असते. आतापर्यंत अशा प्रकारच्या केसेसमध्ये फ्रॅक्चर हॉरिझॉन्टल (Horizontal) पद्धतीचे पाहायला मिळत होते. परंतु, ही पहिलीच अशी घटना आहे की ज्यात प्रायव्हेट पार्टला व्हर्टिकल (Vertical) फ्रॅक्चर झाले आहे. या व्यक्तीची ही केस ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिध्द झाली आहे. ही केस तशी दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

  या केसमध्ये त्याच्या खासगी अवयवातील ट्युनिका एल्बुजिनियात (Tunica albuginea) समस्या उद्भवल्याचं आढळून आलं आहे. हा इरेक्टाईल टिश्यू किंवा उतीवर एक संरक्षक थर असतो. यामुळे या भागात रक्तपुरवठा पोहोचवण्यास मदत होते. हा पुरुष सेक्सदरम्यान कोणत्या पोझिशनमध्ये होता याबाबत डॉक्टरांकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. याबाबत युरॉलॉजिस्टसनी (Urologist) सांगितलं की, ८८ टक्के प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर केसेस या सेक्सदरम्यान होतात. प्रायव्हेट पार्ट ब्रेक होण्यास काही अन्य कारणंदेखील आहेत. त्यात अतिप्रमाणात हस्तमैथुन आणि झोपण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा समावेश असतो.

  एका अहवालानुसार, मध्य-पूर्व देशांमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे ही समस्या उद्भवताना दिसते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्यपणे हॉरिझॉन्टल फ्रॅक्चर केसमध्ये क्रॅक होताना आवाज येतो. टेलिग्राफच्या अहवालानुसार, १९२४ पासून पुरुषांमध्ये प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याच्या १६०० केसेसची नोंद झालेली आहे. याबाबत संशोधकांनी स्पष्ट केलं की ५० टक्के केसेसमध्ये क्रॅक झाल्यानंतर आवाज ऐकू आला आणि ५ पैकी ४ पुरुषांनी अशी दुखापत झाल्यावर आपली इरेक्शनची क्षमता गमावली आहे.

  मात्र या व्यक्तीच्या केसमध्ये असं काही आढळून आलं नाही आणि फ्रॅक्चर होताना आवाजही ऐकू आला नाही. दुखापत झाल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टला सूज आली होती. या दुखापतीवर सुमारे ६ महिने उपचार केल्यानंतर आता ही व्यक्ती लैंगिकदृष्ट्या देखील फिट झाली आहे.

  first case recorded in the world uk man private part fracture vertically