५५ वर्षीय फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणच्या ‘पोस्ट कोविड’ धावण्यासाठीच्या टीप्स

कोरोनातून बरे झाल्यानंतर सोमणने लगेच धावण्यास सुरुवात केली आहे. पोस्ट कोविडमध्ये मिलिंद सोमण ५ ते ६ किमी धावतो. आपल्या चाहत्यांसाठी मिलिंदने पोस्ट कोविड रनिंग टिप्स दिल्या आहेत.

  आपल्या फिटनेस आणि एक्टिव्ह लाईफमुळे वयाच्या ५५ वर्षीही अभिनेता, मॉडल मिलिंद सोमण अनेकांचा फिटनेस आयकॉन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आपल्या सुदृढ आरोगाबाबत माहिती देत, व्यायाम करण्याबाबत अनेक टीप्स सोमण सातात्याने देत असतो. मार्च महिन्यात मिलिंद सोमणला कोरोना संक्रमण झालं होतं. त्यावेळी त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. तुमचा विश्वास बसणार नाही कोरोनाकाळात सतत प्रवासासाठी बाहेर असलेल्या मिलिंद सोमण यांनी जवळपास ३० पेक्षा अधिकवेळा आरटी पीसीआर टेस्ट (RT PCR Test) करून घेतली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सोमणने लगीच धावण्यास सुरुवात केली आहे. पोस्ट कोविडमध्ये मिलिंद सोमण ५ ते ६ किमी धावतो. आपल्या चाहत्यांसाठी मिलिंदने पोस्ट कोविड रनिंग टिप्स दिल्या आहेत.

  मिलिंदने खुलासा केला की तो नेहमी आरामदायक चपला वापरतो. “चालण्यासाठी चपला किंवा लुना सँडल घालतो. मला बंद शूज अस्वस्थ वाटतात, मी माझ्या नैसर्गिकरित्या चालण्याचा प्रयत्न करतो. मला मऊ / कडक पृष्ठभागाचा काहीही फरक पडत नाही. टेक्निकचा विषय आहे. हळूवारपणे, योग्यरित्या नियमितपणे धावणे पाय मजबूत करणं आणि गुडघ्यांसाठी चांगले आहे. ”

  जेव्हा आपण दररोज व्यवस्थित धावता तेव्हा पाय, गुडघे मजबूत होतात.
  एकदा आपण धावणे सुरू केले आणि आजारी पडल्यानंतर पुन्हा रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा हळूहळू धावायला सुरूवात करा. जर तुम्ही नियमित धावाल तरच तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

  ”जर मी पाच ते सहा कि.मी. धावत आहे तर मला एका दिवसात विशेष आहाराची आवश्यकता नाही. होय, रोज जर मी ५० ते ६० कि.मी. चालत असल्यास मला माझ्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मला अधिक खाण्याची आवश्यकता असू शकेल.” असंही तो म्हणतो

  पुढे त्यानं सांगितलं की, ”मी धावताना कधीही सनस्क्रीन वापरत नाही. धावताना जर ऊन जास्त असेल तर मी फक्त माझ्या तोंडावर दही लावतो. जेव्हा दही सुकल्यानंतर मी माझे तोंड पाण्याने धुतो. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि टॅनिंगचा त्रास होत नाही.

  वयाच्या ५५ व्या वर्षी मिलिंद आपले आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तो तरूणांसाठी प्रेरणादायक ठरत असून तो बर्‍याचदा लोकांना कोरोनाची लस घेण्याचे असे आवाहन करत आहे. कारण, तो कोरोनापासून बरा झाल्यानंतर, त्यातील लक्षणे, शारीरिक दुर्बलता जाणवली आहे, अशा परिस्थितीत ते कोरोनाला एक कठीण अनुभव म्हणून तो त्याच्याकडे पाहतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  याशिवाय त्यांना आपल्या आहारात भात, डाळ खिचडी आणि सिजनल भाज्या, फळं, चपात्यांचा समावेश करायला आवडतो. संध्याकाळी ते एक कप गुळाचा काळा चहा येतात. आपल्या फिटनेसचं सिक्रेट लोकांना सांगताना मिलिंद सोमण नमूद करतात की, ते नेहमीच तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड, पाकीट बंद पदार्थांपासून लांब राहतात. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा अल्कोहोलचे सेवन करतात. मिलिंद यांच्या रात्रीच्या जेवणात डाळ खिचडी किंवा भाज्यांची प्लेट असे हलके जेवण असते. अंथरुणावर झोपण्यापूर्वी गरम पाण्यात हळद घालून याचे सेवन करतात.