या देशी उपायांचा करा अवलंब आणि मच्छरांपासून स्वत:ला वाचवा; ओव्याची ‘ही’ ‘ट्रिक वापरल्यास मच्छर औषधालाही शिल्लक राहणार नाहीत

जाणकार सांगतात जेथे झेंडूची फुले असतात, त्या ठिकाणी मच्छर फिरकतही नाहीत, म्हणजेच, मच्छरांना पळवून लावण्यासाठी झेंडूचे फूल हे अत्यंत फायदेशीर ठरते.

  या देशी उपायांचा करा अवलंब आणि मच्छरांपासून स्वत:ला वाचवा; ‘हा’ उपाय केल्यास मच्छर तुमच्या जवळपासही भटकणार नाहीत
  थंडी सरताच लोकांना मच्छर सळो की पळो करून सोडतात. कारण बदलत्या हवामानामुळे मच्छरांची संख्या वाढू लागते. यामुळे लोकांची झोपच उडते आणि लोकं डेंग्यू, मलेरिया सारख्या जीवघेण्या आजारांच्या विळख्यात सापडतात.

  अशातच मच्छर पळवून लावायचे असल्यास अनेक डिव्हाइसेस,कॉइल्सवर पैसे खर्च करावे लागतात पण, या गोष्टी शरीरासाठीही अपायकारक असतात.

  अशातच मच्छरांपासून बचाव करायचा असल्यास घरगुती उपाय अत्यंत लाभदायक ठरू शकतात. हे स्वस्तच नाही, तर शरीरासाठीही ते अपायकारक ठरत नाहीत. चला तर जाणून घेऊयात अशाच काही उपायांबाबत

  जाणकार सांगतात जेथे झेंडूची फुले असतात, त्या ठिकाणी मच्छर फिरकतही नाहीत, म्हणजेच, मच्छरांना पळवून लावण्यासाठी झेंडूचे फूल हे अत्यंत फायदेशीर ठरते.

  कडुलिंबाच्या तेलाच्या वापर केल्यास मच्छर पळून जातात. यासाठी झोपताना काही अंतरावर आपल्या डोक्याजवळ कापूर मिश्रित

  कडुलिंबाच्या तेलाच्या दिवा लावावा. यामुळेही मच्छर तुमच्या जवळपासही भटकणार नाहीत.

  ज्या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त असतो, तेथे ओवा टाकावा किंवा ओव्याची पावडर टाकल्याने मच्छर पळून जातात

  पुदीन्याच्या पानांचा रसाचे थेंब शिंपडल्यास मच्छर दूर पळून जातात. हे शरीरावरही लावता येऊ शकतं, हे आरोग्यासाठीही अजिबातच अपायकारक नसतं.

  घरात लावलेले तुळशीचे रोपटे हे पवित्र असून यासोबतच यामुळे मच्छरही दूर पळून जातात, तर यापासून अन्य रोगांचाही बचाव होतो.

  यासाठी तुळशीचे रोपटे आवश्य लावायलाच हवे.

  याशिवाय काळ्यामिरीचे अरोमा तेलही मच्छरला पळवून लावण्यास लाभदायक ठरते.

  या सर्व घरगुती उपायांचा अवलंब केल्यास मच्छरांना तुम्ही तुमच्या घरातून पळवून लावण्यात यशस्वी होऊ शकता.