मैत्रीसाठी कायपण म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी दिला जीव आणि…

भारतात फ्रेंडशिप डेचं हेच महत्त्व आहे असं नाही. कारण भारतात मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत. महाभारत आणि रामायणात असलेली मैत्री भारतीय लोकांना आजही आकर्षित वाटते. हनुमान, सुग्रीव, कृष्ण, सुदामा यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही दिले जाते.

    १९३५ मध्ये अमेरिकेतील एका घटनेनंतर फ्रेंडशिप डेला (Friendship Day) सुरुवात झाली. या एका घटनेमुळे ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी (First Sunday) जगभरात फ्रेंडशिप डे (Friendship Day) साजरा केला जातो. पण आज अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, फ्रेंडशिप डे (Friendship Day) का साजरा केला जातो. या दिवशी एका मित्राने दुसऱ्या मित्रासाठी जीव दिला होता. त्यांची आठवण म्हणून आज हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो.

    असं म्हटलं जातं की, १९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने एका निर्दोष व्यक्तीची हत्या केली होती. त्यानंतर दु:खी झालेल्या त्याच्या मित्राने देखील आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा होऊ लागला. दक्षिण अमेरिकेतील लोकांनी त्या निर्दोष मित्रांच्या मृत्यूवर राग व्यक्त केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या सरकारला त्यांची गोष्ट ऐकावी लागली. पण यासाठी २१ वर्ष लागली.

    १९५८ मध्ये अमेरिका सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आणि संपूर्ण जग ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे (Friendship Day) म्हणून साजरा करू लागले. पण भारतात फ्रेंडशिप डेचं हेच महत्त्व आहे असं नाही. कारण भारतात मैत्रीची अनेक उदाहरणं आहेत. महाभारत आणि रामायणात असलेली मैत्री भारतीय लोकांना आजही आकर्षित वाटते. हनुमान, सुग्रीव, कृष्ण, सुदामा यांच्या मैत्रीचे उदाहरण आजही दिले जाते.

    Friendship Day 2021 Saying something for friendship one friend gave his life for another friend