हॅवमोरतर्फे भारतात ३ अनोख्या स्वादांसह ‘वर्ल्ड कोन’ लाँच

ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या गरजा समजून घेत वर्ल्ड कोन स्विस चोको ब्राऊनी, डबल बेल्जियन चॉकलेट आणि नटी फ्रेंच व्हॅनिला अशा तीन रूचकर स्वादांत उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रीमियम हॅवमोर आईस्क्रीम्स कुकीज, चॉकलेट श्रिवेल्स ब्राऊनी, बदाम व काजूचा वापर करून आणखी स्वादिष्ट बनवण्यात आली आहेत.

    मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रॅण्ड्स पैकी हॅवमोर या ब्रँड ने उत्पादन श्रेणीत ‘वर्ल्ड कोन’ चा समावेश केल्याचे जाहीर झाले आहे. तब्बल २२.२ सेमीचा हा कोन देशातील सर्वात मोठा आईस्क्रीम कोन आहे. महिन्याभरापूर्वी गुजरातमध्ये लाँच करण्यात आलेल्या या वर्ल्ड कोनला मिळालेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेत त्याचे लाँच संपूर्ण भारतात करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच १४ देशात या कोनची विक्री होत आहे, आणि या पैकी दक्षिण कोरिया मध्ये वर्ल्ड कोन ची विक्री सर्वात अधिक आहे असे निदर्शनास आले आहे.

    ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या गरजा समजून घेत वर्ल्ड कोन स्विस चोको ब्राऊनी, डबल बेल्जियन चॉकलेट आणि नटी फ्रेंच व्हॅनिला अशा तीन रूचकर स्वादांत उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रीमियम हॅवमोर आईस्क्रीम्स कुकीज, चॉकलेट श्रिवेल्स ब्राऊनी, बदाम व काजूचा वापर करून आणखी स्वादिष्ट बनवण्यात आली आहेत. याच्या प्रत्येक स्वादामध्ये मिल्क क्रीम आणि मिल्क ने बनवलेल्या आईस्क्रीम ची चव आहे.

    याचे पॅकेजिंग सहजपणे काढता येणारे असल्यामुळे हात खराब न करता आईस्क्रिमचा स्वाद घेता येतो. हॅवमोरची पालक कंपनी – लोट्टे चा अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे नाविन्यपूर्ण उत्पादन प्रत्यक्षात आले आहे. रूचकर स्वादांतला मोठा कोन आणि नाविन्यपूर्ण पॅकेजिंगमुळे हॅवमोर वर्ल्ड कोन या वर्षी बाजारपेठेत आलेल्या सर्वात चर्चेतल्या आईस्क्रिम्सपैकी एक ठरले असून त्याचे असंख्य ग्राहक म्हणत आहेत, ‘बिग इज बेटर!’