अशी मिळवा मशरुमपासून सुंदर त्वचा; तुमच्या सौंदर्याला लागतील चार चाँद

मशरुम फेस पॅक (Mushroom Face Pack) तयार करण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये ओट्स आणि मशरुम पावडरमध्ये थोडे पाणी घालून एक घट्ट पेस्ट तयार करून घ्या. आता यात टी ट्री तेल, निंबाचा रस आणि व्हिटामीन ई कॅप्सूल घालून चांगल्या प्रकारे मिश्रण एकजीव करा.

  मशरुमचे सेवन फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर ते त्वचेचा रंगही उजळण्याचे काम करतात. कारण मशरुम (Mushroom) मध्ये काही पोषणतत्त्वे आढळतात जी त्वचेचा पोत उत्तम राखण्यासाठी सहाय्यक ठरतात. मशरुम (Mushroom Face Pack) मध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात, ज्यामुळे मुरुम, सुरकुत्या दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. मशरुमच्या फेसपॅकचा वापर करणे खूपच लाभदायक आहे, विशेषत: उन्हाळ्यात. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करतात मशरुम फेस पॅक…

  मशरुम फेस पॅक (Mushroom Face Pack) साहित्य :

  १ चमचा मशरूम पावडर
  पाव कप ओट्स
  ३ थेंब टी ट्री तेल
  २ चमचे लिंबाचा रस
  १ व्हिटामीन ई- कॅप्सूल

  तयार करण्याची कृती :

  मशरुम फेस पॅक (Mushroom Face Pack) तयार करण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये ओट्स आणि मशरुम पावडरमध्ये थोडे पाणी घालून एक घट्ट पेस्ट तयार करून घ्या. आता यात टी ट्री तेल, निंबाचा रस आणि व्हिटामीन ई कॅप्सूल घालून चांगल्या प्रकारे मिश्रण एकजीव करा. पेस्ट तयार झाल्यानंतर ती चेहऱ्यावर लावा. २०-३० मिनिटे ते सुकू द्या.

  त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. आपण आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करू शकता. याचा वापर केल्याने मुरुम, सुरकुत्या इत्यादींपासून तुमची सुटका होऊ शकते. याशिवाय, त्वचेत एक वेगळाच नितळपणा येतो. काही लोकांना मशरुमच्या अॅलर्जीची समस्या असते. त्यामुळे अशा लोकांनी या फेसपॅकचा वापर करणे टाळावे.

  ज्यांना कुठलीही समस्या नाही, त्यांनी आपल्या सौंदर्यात चार चाँद लावण्यासाठी ‘मशरुम फेस पॅक’चा वापर एकदा तरी करून पाहायला काहीच हरकत नाही.

  Get beautiful skin from mushrooms Your beauty will take four moons