Get instant glow on skin at home; Tanning, stains, pimples will all disappear away

आयुष्यात आराम करायला कोणाला आवडत नाही? धावपळीचे आयुष्य, कामाचा ताण, खासगी आयुष्यातील समस्या इत्यादी गोष्टींमुळे हल्ली आराम मिळणे तसे अवघड झाले आहे. पण बहुतांश महिला तसेच पुरुष देखील शारीरिक थकवा, ताणतणाव कमी करण्यासाठी बॉडी मसाज आणि फेशिअलची मदत घेतात. या ट्रीटमेंटमुळे आपल्या आरामही मिळतो आणि शरीर तसेच चेहऱ्याच्या त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येते.

    मुंबई : आयुष्यात आराम करायला कोणाला आवडत नाही? धावपळीचे आयुष्य, कामाचा ताण, खासगी आयुष्यातील समस्या इत्यादी गोष्टींमुळे हल्ली आराम मिळणे तसे अवघड झाले आहे. पण बहुतांश महिला तसेच पुरुष देखील शारीरिक थकवा, ताणतणाव कमी करण्यासाठी बॉडी मसाज आणि फेशिअलची मदत घेतात. या ट्रीटमेंटमुळे आपल्या आरामही मिळतो आणि शरीर तसेच चेहऱ्याच्या त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येते.

    त्वचेवरील दुर्गंध, टॅनिंग, डाग, मुरूम दूर होतात. त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी महिलावर्ग कित्येक उपाय करत असतात. पण अरोमाथेरपी क्वचितच केली जाते. अशा प्रकारच्या फेशिअलमध्ये एसेंशिअल ऑईलचा वापर केला जातो. हे तेल त्वचेसाठी अतिशय लाभदायक असते.

    ​फेशिअलमध्ये एसेंशिअल ऑईलचा वापर
    तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार अरोमाथेरपी फेशिअलमध्ये एसेंशिअल ऑईलचा वापर केला जातो. या तेलामुळे तुमच्या त्वचेला भरपूर प्रमाणात लाभ मिळतात. तेलातील औषधी गुणधर्म त्वचा आणि रोमछिद्रांवर कार्य करतात. या फेशिअलमुळे मुरूम, डाग आणि त्वचेशी संबंधित अन्य समस्या दूर होण्यास मदत मिळते. मसाजमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

    ​नितळ त्वचा
    चेहऱ्या पाण्याची वाफ घेणे ही अरोमाथेरपी फेशिअलमधील एक महत्त्वपूर्ण स्टेप आहे. पाण्याची वाफ चेहऱ्यावर घेतल्याने रोमछिद्रांमधील दुर्गंध बाहेर पडते. ज्यामुळे चेहरा नितळ होण्यास मदत मिळते. पाण्यामध्ये एसेंशिअल ऑईल मिक्स करून चेहऱ्यावर वाफ घ्यावी. या प्रक्रियेमुळे तुमच्या त्वचेला मोठ्या प्रमाणात लाभ मिळतात.

    ​मृत पेशींची समस्या
    चेहऱ्यावर वाफ घेतल्यानंतर एक्सफोलिएशन ही अरोमाथेरपीतील पुढील स्टेप असते. जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याला योग्य पद्धतीने स्क्रब करतो, तेव्हा चेहऱ्यावरील मृत पेशींची समस्या कमी होते. यामुळे आपली त्वचा मऊ आणि नितळ राहण्यास मदत मिळते. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी चांगल्या आणि आयुर्वेदिक स्क्रबचा वापर करावा.

    ​ताणतणाव होतो कमी
    शारीरिक ताणतणाव कमी करण्यासाठी एरोमॅटिक आणि एसेंशिअल ऑईल अद्भुत प्रकारे काम करतात. तेलातील पोषक घटक तणाव कमी करतात. यामुळे मेंदूसह संपूर्ण शरीराला आराम मिळतो. अरोमाथेरपी फेशिअलमुळे तुम्हाला शरीर हलके झाल्यासारखे जाणवते. मसाजमुळे शरीराच्या स्नायूंना देखील आराम मिळतो.

    ​घरगुती सोपी पद्धत
    तुम्ही घरातही सहजरित्या अरोमाथेरेपी फेशिअल ट्रीटमेंट घेऊ शकता. यासाठी काही सामग्रींची आवश्यकता आहे. पण जर तुम्हाला रिलॅक्स व्हायचे असेल तर एखाद्या स्पा किंवा सलूनमध्ये जाऊन अरोमाथेरपी फेशिअल करून घ्या. शरीराप्रमाणेच त्वचा देखील डिटॉक्स करण्याची आवश्यकता आहे. त्वचेवर जमा झालेले धूळ मातीचे कण दूर करण्यासाठी ही ट्रीटमेंट घ्यावी.