have questions about safe pregnancy sex lets know it all

गर्भारपणात लैंगिक संबंधांची इच्छा असूनही आपण त्यापासून दूर राहण्यालाच प्राधान्य देता आणि ते तुम्हाला योग्यही वाटतं. पण असा विचार करणं चुकीचं आहे. गर्भारपण आणि अशा परिस्थितीत लैंगिक संबंध ठेवणे योग्य नाही असं अनेकांना वाटतं. या लेखात आपण याबाबत माहिती जाणून घेऊया. गर्भारपणात लैंगिक संबंध ठेवणं सुरक्षित असून यामुळे होणाऱ्या बाळावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

लैंगिक संबंध ही आपल्या शरीराची आवश्यक गरज आहे असं मानलं जातं पण गर्भारपणात लैंगिक संबंध ठेवण्यास अनेक दांपत्यांना भीती वाटते. कारण लैंगिक संबंध ठेवल्याने आपल्या बाळाला काही नुकसान होऊ नये हा त्यामागील हेतू असतो. गर्भात बाळ, एमनियोटिक द्रव, गर्भाशय आणि मांसपेशींमुळे सुरक्षित असते. तसं पाहता गर्भारपणात लैंगिक संबंध ठेवणं सुरक्षित आहे. पण महिलांमध्ये गर्भावस्थेदरम्यान अनेक बदल होत असतात, शारीरिक आणि भावनात्मक अशा दोन्ही स्वरुपात हे बदल होत असतात. यामुळे महिलांच्या लैंगिक इच्छेतही सातत्याने बदल होत असतात. याशिवाय, गर्भार अवस्थेतील शारीरिक असुविधा किंवा बाळाला नुकसान होईल अशी शंका येणं, यामुळे
दांपत्यांमधील लैंगिक संबंध प्रभावित होण्याची शक्यता असते.

गर्भार अवस्थेत लैंगिक संबंध ठेवणे कितपत सुरक्षित आहे?

जोपर्यंत गायनॅकोलॉजिस्ट किंवा दाई आपल्याला संभोग न करण्याची काही ठोस कारणं सांगत नाही तोपर्यंत तुम्ही लैंगिक सुखाचा आनंद घेऊ शकता. हे आपल्यासाठी, आपल्या जोडीदारासाठी आणि विकसनशील बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. (जर आपला डॉक्टर किंवा दाई फक्त ‘सेक्स’ असं म्हणते, तर ते स्पष्ट होईपर्यंत घाबरू नका. याचा अर्थ फक्त भावना उत्तेजित होणं असा आहे.)

गर्भार अवस्थेदरम्यान लैंगिक संबंध फक्त सुरक्षित नाहीत तर आपल्यासाठी हे चांगलंच आहे. ज्या महिलांना गर्भधारणेच्या दरम्यान भावनोत्कटता प्रकट करतात, हार्मोन्स वाढणे आणि हृदयाच्या रक्त प्रवाहाची त्यांना कोणतीही समस्या राहात नाही आणि या सर्व गोष्टी होणाऱ्या बाळासाठी लाभदायक असतात. महिला आरोग्य आणि लैंगिक औषधांविषयी युरोलॉजीच्या सहाय्यक डॉक्टर आणि लैंगिक सल्लागाराद्वारे नवभारत टाइम्सला ही माहिती दिली आहे.

लैंगिक इच्छेत परिवर्तन होणे : काही महिलांना गर्भावस्थेदरम्यान लैंगिक इच्छा किंवा आवडीनिवडींमध्ये बदल होतो. लैंगिक इच्छेत बदल होण्याचे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत, ती अशाप्रकारे आहेत:

गर्भार अवस्थेत सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये थकवा जाणवतो आणि खूप मळमळ होते यामुळे लैंगिक संबंधांमधील इच्छा कमी होते.

गर्भार अवस्थेत चारपासून ते सहा महिन्यांपर्यंत पेल्विकच्या रक्त प्रवाहात वाढ आणि स्तनाच्या आकारात वाढ झाल्याने सेक्स करण्याची इच्छा वृद्धिंगत होते. गर्भार अवस्थेत शेवटच्या तीन महिन्यांत थकवा, पाठदुखी किंवा शारीरिक दुखणी किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते.

एकूणच, अधिकाधिक महिलांना आपल्या गर्भार अवस्थेत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाल्याचा अनुभव येतो. हे सामान्य आहे, आणि बहुतेक प्रकरणात लैंगिक संबंधांमधील आवड कमी झाल्याचा अनुभव अनेक महिलांना येतो. हे सामान्य आणि निरोगी असण्याचे लक्षण आहे. जोडीदाराच्या गर्भारअवस्थेदरम्यान पुरुषांनाही लैंगिक संबंधांमधील आवड कमी झाल्याचा अनुभव येतो. यात आपल्या जोडीदारात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे किंवा बाळाला काही नुकसान होऊ नये किंवा वडील होण्याची जबाबदारी आणि चिंता यांचा समावेश असू शकतो, गर्भार अवस्थेत पती-पत्नीने लैंगिक संबंधांबाबत मोकळेपणाने एकमेकांशी चर्चा करायला हवी.

जर लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी झाल्यास दांपत्य लैंगिक निकटतेसाठी अन्य पर्यायही निवडू शकतात, जसे की cuddling किंवा मालिश. अधिकाधिक महिलांसाठी गर्भार अवस्थेत लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित मानले गेले आहे. प्रत्येक क्षेत्रात काहीना काही अपवाद असतातच. जाणून घेऊयात अशाच काही अपवादात्मक गोष्टींबाबत:

१) योनीतून विनाकारण रक्तस्त्राव होणे.
२) ओटीपोटात वेदना, पेटके येणे किंवा आकुंचन.
३) जर पाण्याचा पडदा फाटला असेल तर.
४) इतर अन्य कारणांमुळे महिलेचा अकाली गर्भपात झाला असेल तर
५) तसेच यापूर्वी जर महिलेची अकाली प्रसुती झाली असेल तर गर्भावस्थेदरम्यान लैंगिक संबंध टाळले पाहिजेत.

जर आपल्याला वरीलपैकी एखादी समस्या असेल तर, किंवा अन्य काही चिंता असेल तर यासाठी आपल्या गायनॅकोलॉजिस्टशी संपर्क साधा. जर यापैकी कोणतीही समस्या नसेल तर गर्भार अवस्थेत तिसऱ्या तिमाहीत लैंगिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे. वास्तविक, काही संशोधनानुसार असेही सिद्ध झाले आहे की, गर्भार अवस्थेत लैंगिक संबंध ठेवल्याने अकाली प्रसुतीचा धोका कमी होऊ शकतो!

have questions about safe pregnancy sex lets know it all

आपल्या गायनॅकोलॉजिस्टशी संपर्क साधा

अनेक महिलांना आपल्या गायनॅकोलॉजिस्टशी लैंगिक संबंधांबाबत चर्चा करण्यात असंकोच वाटतो. जर आपल्याकडे आपल्यात होणाऱ्या अंतर्गत बदलांविषयी काही प्रश्न असतील, तर आपली गायनॅकोलॉजिस्ट आपल्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी सर्वात उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. जर ती आपल्यासोबत गर्भार अवस्थेत लैंगिक संबंधांविषयी चर्चा करण्यास संकोच करत असेल, तर आपण कोणताही लाज न बाळगता तिला चर्चा करण्यास प्रवृत्त करायला हवे. लैंगिक संबंधांबाबत आपले प्रश्न मान्य आणि महत्त्वपूर्ण आहेत जेवढे की, आपल्या आरोग्याविषयीच्या अन्य समस्या आहेत.