चहाबरोबर ‘हे’ पदार्थ खाण्याची सवय आहे? तर वेळीच सावध व्हा…नाहीतर होऊ शकतो कॅन्सर!

काहींना चहा पिताना त्याबरोबर काहीतरी खायला आवडतं. पण, चहाबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो.

  सकाळी चहा घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. सकाळी पेपर वाचताना, संध्याकाळी किंवा अगदी दुपारी थकवा जाण्यासाठी सगळे चहा घेतात. काहींना चहा पिताना त्याबरोबर काहीतरी खायला आवडतं. पण, चहाबरोबर काही पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो.

  हे पदार्थ टाळा

  चहा प्यायल्यावर लगेच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिअ‍ॅक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो. पोटात गॅस, आंबटपणा किंवा बद्धकोष्ठता सारख्या समस्या उद्भवू शकतात.

  assam tea

  लेमन टी नकोच

  काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच ‘लेमन टी’ प्यायला आवडते. लेमन टीने वजन ही कमी होतं असं सांगितलं जात. लिंबाचा रस आणि चहा एकत्र झाल्याने आम्लिय पदार्थ बनतात. त्यामुळे फुप्फुसांना त्रास होतो. हा चहा रिकाम्या पोटी प्यायलास छातीत जळजळ होऊ शकते. अ‍ॅसिडिटी, अपचन आणि गॅसचा त्रास होतो.

  त्याचबरोबर स्नॅक्सचे प्रकार बेसनाने बनलेले असतात. शिवाय काहींना चहाबरोबर भजी खायलाही आवडतात. पण, बेसन पिठाचे कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत. बेसन पिठाचा पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्या पदार्थाची पौष्टिकता कमी होते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो.

  चहा प्यायल्यावर कधीही थंड पदार्थ खाऊ नयेत. चहा प्यायल्यावर पाणी प्यायल्यास किंवा थंड पदार्थ खाल्यास चयापचय क्रियेवर याचा वाईट परिणाम होतो. पचनशक्ती कमकूवत झाल्याने मळमळ,ऍसिडिटी, अपचन सारखा त्रास होतो. चहा प्यायल्यावर किमान अर्धातास थंड पदार्थ खाऊ नये.