जगातली सगळ्यात फिट महिला टिया क्लेयर टूमी; जाणून घ्या काय आहे तिच्या फिटनेसचं Secret

टिया एक युट्यूब चॅनल चालवते. तिथेच तिने डायट प्लॅन शेअर केला आहे. २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी ती तयारी करते आहे. वर्काऊट दरम्यान शरीराला योग्य प्रमाणात एनर्जी मिळण्यासाठी योग्य प्रमाणात कॅलरीज घेणं अत्यंत आवश्यक आहे. याकरता ती आपला डायट प्लॅन काटेकोरपणे फॉलो करते.

  टिया क्लेयर टूमी जगातली सगळ्यात फिट महिला आहे. तिने ४ वेळा ‘क्रॉसफिट गेम्स’ विजेतेपद पटकावले आहे. ती पाचव्यांदा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी विजेतेपद पटकावलं तर ती पुरुष बॉडी बिल्डर मॅट फ्रेसर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडेल. टियाने आपला डेली डाएट प्लॅन आपल्या फॅनसाठी शेअर केलेला आहे.

  टिया एक युट्यूब चॅनल चालवते. तिथेच तिने डायट प्लॅन शेअर केला आहे. २०२१ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी ती तयारी करते आहे. वर्काऊट दरम्यान शरीराला योग्य प्रमाणात एनर्जी मिळण्यासाठी योग्य प्रमाणात कॅलरीज घेणं अत्यंत आवश्यक आहे. याकरता ती आपला डायट प्लॅन काटेकोरपणे फॉलो करते.

  टिया आपल्या दिवसाची सुरुवात साडेसात वाजता करते. सकाळी उठल्यानंतर ती पाणी पिते आणि त्यानंतर १२८ ग्रॅम ओटमील, ४० ग्रॅम ब्लूबेरी, १ चमचा मध आणि १ केळं असा आहार घेते. आपला पहिल्या ब्रेकफास्टमधून तिला ४५५ कॅलरीज मिळतात. ज्यामुळे ताकद वाढते.

  वर्काऊटनंतर टिया आपला दुसरा ब्रेकफास्ट घेते. त्यामधून तिला ६४० कॅलरीज मिळतात. गव्हापासून बनवलेला ब्रेड त्यावर टोपिंग, पीनट बटर, ब्लूबेरी जाम, अवोकाडो आणि उकडलेलं अंड असतं.

  केवळ ब्रेड, पीनट बटर, अवोकाडो आणि उकडलेलं अंड यामधून तिला पूर्ण एनर्जी मिळत नाही. म्हणूनच ती दुसर्‍या ब्रेकफास्टमध्ये पीनट बटर आणि ब्लूबेरीज जाम देखील घेते. यामुळे तिला ताकद मिळते आणि लवकर भूक लागत नाही. अंड्यामधून प्रोटीन, अवोकाडो मधून गुड फॅट आणि केळ्यामुळे एनर्जी मिळतं.

  जेवणाआधी पाणी न घालता विगन प्रोटीन शेक पिते. त्यामुळे तिच्या शरीराला प्रोटीन मिळतं. प्रोटीनसाठा ती स्मृदी पिते. प्रोटीनमुळे तिला एक्सट्रा एनर्जी मिळते.

  दुपारच्या जेवणामध्ये टीया राजमा, बासमती तांदळाचा भात, थोडीशी चिंच, भाजी आणि गाजर खाते यामधून तिला ९५० कॅलरीज मिळतात. दुपारच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेड घेण्याचा प्रयत्न ती करते.

  रात्रीच्या जेवणामधून जास्तीत जास्त प्रोटीन शरीराला मिळतील याचा प्रयत्न करते. त्या करता मटण किंवा सालमन फिश यासोबत हिरवी पालेभाजी, भात घेते. मधून तिला ५९८ कॅलरीज मिळतात.

  जेवण, स्नॅक्स आणि सप्लीमेंट यांच्या माध्यमातून वरकाऊटच्यावेळी दिवसभरामध्ये २९०० कॅलरी देणारा आहार टिया घेते. यामुळे तिला वर्काऊटनं करण्याची ताकद मिळते.

  प्रचंड मेहनत करून टियाने आपलं शरीर कमावलं आहे. तिचे बायसेप्स, ऍब्स, ट्रायसेप्स, शोल्डर आणि फोरआर्म पाहूनच तिच्या ताकदीचा अंदाज येतो. २७ जुलैला क्रॉसफिट गेम सुरू होणार आहेत. त्यात पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी ती सज्ज झालीये.

  health tips tia clair toomey fittest woman on earth reveals her diet plan before crossfit games