पार्टनर तणावात असल्यास त्याला द्या असा आधार

समोरचा एखादी गोष्ट तुम्हाला सांगत आहे तो खरोखरच योग्य पद्धतीने विचार करण्याच्या स्थितीत नाहीये. तथापि अशावेळी प्रयत्न करा की, तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्याला विश्वास द्या की, तुम्ही सर्व गोष्टी जाणता आणि सर्वकाही लवकरच ठीक होणार आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांमध्ये तणाव ही एक सामान्य समस्या झाली आहे. कोणीही असा व्यक्ती नाही ज्याला तणाव माहिती नाही. अशावेळी समोरच्या व्यक्तीला अशा माणसाची गरज आहे ज्याच्यावर तो सर्वाधिक प्रेम करतो, पण समोरच्या व्यक्तीला अनेकदा कळतच नाही या परिस्थितीला सामोरं कसं जायचं कारण तणावाने ग्रासलेल्या व्यक्तीचा व्यवहार हा खूपच विचित्र असतो. आज आम्ही आपल्याला हे सांगणार आहोत की, अशा व्यक्तीला कशाप्रकारे मदत केल्याने तुम्ही तुमच्या पार्टनरला कशाप्रकारे यातून बाहेर काढू शकता.

तणावाच्या या परिस्थितीत जर तुमचा पार्टनर एखादी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत असेल तर ती तुमच्यावर ओढवून घेऊ नका, कारण तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की, समोरचा एखादी गोष्ट तुम्हाला सांगत आहे तो खरोखरच योग्य पद्धतीने विचार करण्याच्या स्थितीत नाहीये. तथापि अशावेळी प्रयत्न करा की, तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्याला विश्वास द्या की, तुम्ही सर्व गोष्टी जाणता आणि सर्वकाही लवकरच ठीक होणार आहे.

जे काम इतर दिवशी एक तासांत पूर्ण होत होतं, आता हेच काम करायला त्या व्यक्तीला दुप्पट वेळ लागू शकतो. अशातच तो स्वत:च अधिकच नाखूष असू शकतो. म्हणून प्रयत्न करा की, तुम्ही तुमच्या पार्टनरला अधिकाधिक कामात मदत करा कारण तो स्वत:ला कमकुवत समजणार नाही आणि त्याचं कामही वेळेत पूर्ण होईल.

अशी समस्या असल्यास अधिकाधिक लोक नाउमेद होतात. जीवनात काही करण्यात रस राहिला नाही, तर जगून तरी काय उपयोग ही भावना त्यांच्या मनात घर करते. अशातच त्यांना याची जाणीव करून द्या की, ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. तुम्ही सोबत अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो. पुढचं आयुष्य किती सुंदर आहे, या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण होईल.

अशावेळी चुकूनही तुमच्या पार्टनरला एकटं सोडू नका, कारण एकटं सोडल्यास त्यांना असं वाटू शकतं की, आपलं या जगात कोणीच नाही. अधिकच विचार केल्यास त्यांची ही समस्या गंभीर रुप धारण करू शकते. जर पार्टनर तुमच्या सोबत रहात नसल्यास फोनच्या मदतीने अधिकाधिक वेळ त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी सगळ्या सकारात्मक गोष्टींविषयी चर्चा करा.