high protein diet can make your bones weak know 7 other side effects nrvb
High protein side effects: हाडं कमकुवत होणं-तोंडाला वास येणं, अति प्रथिनांच्या सेवनाने शरीराला होतात ७ मोठे तोटे

अति प्रमाणात प्रथिने सेवन करणं हे आपल्या हाडांसाठी धोकादायक ठरतं. मांस किंवा पौष्टिक पूरक आहारातून प्रथिने घेणाऱ्यांनी अधिक जागरूक असणं गरजेचं आहे.

प्रथिने आपल्या शरीरातला खराब झालेला भाग दुरुस्त करण्याचे कार्य करतात. ही मेंदूच्या हायपोथालेमससाठी देखील चांगली आहेत, ज्यामुळे आपल्या मेंदूची स्मरणशक्ती तल्लख राहते.पण सातत्याने अति प्रथिनांच्या सेवनाने काही तोटेही होतात म्हणून, प्रथिने घेणाऱ्यांना आपल्या शरीराला रोज प्रथिनेची किती मात्रा आवश्यक आहे हे ज्ञात असणं गरजेचं आहे. आम्ही आपल्याला अति प्रथिनांच्या सेवनाने किती तोटे (High protien side effects) होतात याविषयी सांगणार आहोत.

हाडांचे विकार :

‘बोन डिसऑर्डर’ हा हाडांशी संबंधित विकार आहे. वर्ष २०१३ मध्ये लॉनिस डेलीमॅरिस यांच्या नेतृत्त्वात झालेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, अति प्रमाणात प्रथिने सेवन करणं हे आपल्या हाडांसाठी धोकादायक ठरतं. मांस किंवा पौष्टिक पूरक आहारातून प्रथिने घेणाऱ्यांनी अधिक जागरूक असणं गरजेचं आहे.

वास्तविक पाहता, अति प्रथिनांमुळे शरीरात तयार झालेल्या ॲसिडमुळे कॅल्शियमच्या कमतरतेची समस्या निर्माण होते. हे आपल्या हाडांसाठी धोकादायक आहे. यात असंही सांगितलं आहे की, लाल मांसाऐवजी हिरव्या भाज्यांतून मिळणाऱ्या प्रथिनेमुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका कमी होतो आणि हाडांची मोडतोड होण्याची समस्याच निकाली निघते.

हृदयविकारांचा धोका :

जनावरांपासून मिळणाऱ्या प्रथिनेमुळे कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी)ची जोखीम वाढते. म्हणजेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता असते. तथापि, मासे, अंडी आणि कमी चरबीयुक्त आहार उत्पादनांमधून हे संभव नाही.

मूत्रपिंडाचा त्रास :

अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झालंय की अति प्रथिनांच्या आहारामुळे मूतखड्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हार्वर्ड विद्यापीठाच्या अहवालानुसार, शरीरात युरिक ॲसिडची पातळी आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांचे सेवन केल्याने मुतखड्याची समस्या वाढीस लागते. म्हणून मूत्रपिंडाच्या समस्येने ग्रासलेल्या लोकांना वनस्पतींपासून मिळणारेच अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

कर्करोग :

लाल मांस हे अति प्रथिने असलेला मुख्य स्त्रोत मानला गेला आहे. काही संशोधकांच्या मते, लाल मांस खाल्ल्याने कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढतो. पुरुषांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळते. प्रक्रिया केलेले मांस सेवन करणाऱ्यांनाही अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अति प्रथिनांचा आहार ठराविक काळासाठी स्नायूंना फायदेशीर ठरतो पण शेवठी अतिरेक केला तर याचे दुष्परिणामच जास्त होतात.

तोंडाला वास येणं :

अधिक प्रमाणात प्रथिनांच्या सेवनाने तोंडाला वास येण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: जर तुम्ही कर्बोदकांना फाटा दिला असेल तर हे प्रमाण कैक पटींनी वाढते. अति प्रथिनांच्या सेवनाने आपले शरीर केटोसिस नामक चयापचयाच्या स्थितीत जाते या ठिकाणी काही विशिष्ट रसायने उत्सर्जित केली जातात त्यामुळे तोंडाला वास येण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे.

शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं :

२००२ साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, शरीरात प्रथिनेचे प्रमाण वाढल्याने शरीरातील पाणी पातळी कमी होते. जर शरीरातील पाणी पातळी योग्य राखली नाही तर पाण्याचं प्रमाण कमी होण्याचा धोका अधिक वाढतो. पाणी आपल्या शरीराचं नुसतं संतुलनच राखत नाही तर आपल्या शरीरातील विषारी घटकपदार्थ उत्सर्जित करण्याचं कामही करतं.