आता पार्लरला जाण्याची गरज नाही, कमी खर्चात ते ही वेदनाविरहीत, घरच्या घरी करा अप्पर लीप्स!

घरगुती उपाय केल्याने तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि केसही सहजपणे काढले जातील. त्यामुळे आता चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही.

    अप्पर लीप्स करण्यासाठी महिलांना हमखास पार्लरमध्ये जावच लागतं. यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची मदत घेतात. पण जर हे घरीच करता आलं तर? तर तुमचा वेळाही वाचेल आणि पैसेही. पार्लरमध्ये न जाता अप्पर लीप्स घरामध्ये असलेल्या साहित्याने कशा काढायचे हे आपण बघणार आहोत.

    १. अंड्याचा पांढरा भाग एका वाटीमध्ये काढा त्यामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर टाका आणि मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण अप्पर लीप्सला लावा आणि साधारण ३० मिनीटांनी ते धुवून टाका.

    २. एका वाटीत लिंबाचा रस घ्या आणि त्यामध्ये एक चमचे साखर घाला साखर चांगली विरघळू द्या. हे मिश्रण अप्पर लिप्सला लावा. साधारण १५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग पाण्याने धुवा.

    ३. अप्पर लीप्सला करण्यासाठी एक चमचे हळद २ चमचे दुधात मिसळून पेस्ट तयार करा. यानंतर, ही पेस्ट अप्पर लीप्सला लावा. १५ मिनिटे सोडा तसेच ठेवा आणि पाण्याने धुवा.

    घरगुती उपाय केल्याने तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि केसही सहजपणे काढले जातील. त्यामुळे आता चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही.