आजचे राशी भविष्य १५ ऑक्टोबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांच्या बाबतीत रुसून दूर गेलेला प्रियकर वा प्रेयसी आयुष्यात नवा रंगासह परतण्याची शक्यता आहे. ‘या’ राशीच्या लोकांना Mutual Fund व्यवहारात जबरदस्त लाभ मिळेल.

  मेष (Aries) :

  जीवनात आनंद येईल. तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. चलाखीने काम केल्यास अधिक पैसे कमवू शकता. समाजातील सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  वृषभ (Taurus) :

  नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे मिळवण्याची संधी मिळेल. न्यायालयीन प्रकरणातील निकाल तुमच्या बाजूने लागेल. नोकरदार लोकांचा सहकाऱ्याशी वाद होऊ शकतो. त्यामुळे सावध रहा.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  मिथुन (Gemini) :

  मर्जीनुसार आवडतं काम कराल. इतरांना तुमची मतं पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांना पैसे मिळू शकतात. समजूतदार पणाच्या अभावामुळे चांगल्या संधी गमावून शकता. अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा येईल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  कर्क (Cancer) :

  नफा कमावण्यासाठी आजचा दिवस खास आहे. तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळाल्याने आनंदी असाल. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला दिलासा मिळले. रोजगाराच्या दिशेने प्रगती होईल. तुमचे मन उपासनेत अधिक गुंतेल.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  सिंह (Leo) :

  दररोजच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:वर लक्ष केंद्रीत करा. अचानक कुठून तरी पैसे कमवू शकता. जे बांधकाम काम करत आहेत, त्यांना मोठा लाभ मिळेल. Mutual Fund व्यवहारात जबरदस्त लाभ मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  कन्या (Virgo) :

  कामाचा अतिरिक्त ताण असेल. व्यवसायात मार्केटिंग संबंधित कामांमुळे उर्जा संचारेल. आर्थिक स्थिती चांगली झाल्याने जागा किंवा वाहन खरेदी करण्याचा मनात विचार येईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  तूळ (Libra) :

  दिवस चांगला जाईल. लोकांसोबत तुमची जवळीक वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांचा तपास पूर्ण होईल. व्यवसायातून तयार झालेल्या संपर्कामुळे फायदा होईल. तरुणांना प्रेमसंबंधात यश मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृश्चिक (Scorpio) :

  घरातून गोड खावूनत बाहेर पडा. इतरांच्या तुलनेत तुम्ही अधिक यशस्वी व्हाल. आर्थिक व्यवहारांबाबत निर्णय घेताना काळजी घ्या. शैक्षणिक कामात तुमची आवड वाढेल. आर्थिक घोटाळेबाजांसाठी आजचा दिवस त्यांचे पितळ उघडे पाडणारा ठरेल.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  धनु (Sagittarius) :

  समिंश्र स्वरुपाचा दिवस असेल. तुम्ही केलेल्या कामाला नवीन ओळख मिळेल. नियोजन करुन गुंतवणूक केल्यास यशस्वी व्हाल. कीटनाशकांचा व्यवहार करणाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होईल. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होतील. रुसून दूर गेलेला प्रियकर वा प्रेयसी आयुष्यात नवा रंगासह परतण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मकर (Capricorn) :

  समिंश्र स्वरुपाचा दिवस असेल. कुटुंबीयांच्या मदतीने कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात मार्केटिंग संबंधित कामाला अधिक महत्त्व द्या. भौतिक सुखसोयीच्या वस्तू खरेदी करण्यात खर्च होऊ शकतो. पोलीस कारवाईची शक्यता जाणवत आहे. तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  कुंभ (Aquarius) :

  दिवस चांगला असेल. कलाक्षेत्राशी संबंधित कामांमध्ये तुमची आवड वाढू शकते. आर्थिक गुंतवणुकीबाबत गंभीरपणे विचार कराल. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला अचानक प्रवासाला करावा लागू शकतो.
  शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7

  मीन (Pisces) :

  शुक्रवार तुमच्यासाठी सामान्य राहील.अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. खेळण्यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. तरुण चांगल्या नोकऱ्यांच्या शोधात असतील. कार्यालयातील सहकारी तुम्हाला मदत करण्यास तयार असतील.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2