कोरोनाच्या काळात ‘फ्रेंडशिप डे’ कसा कराल साजरा? या दिवसाचं वैशिष्ट्य काय, जाणून घ्या

मैत्रीच्या नात्यामध्ये असणारी व्यक्ती ही आपल्या निवडीवर अवलंबून असलेल्या काही व्यक्तींपैकी एक असते. मैत्रिला अजून घट्ट करण्यासाठी आपण मित्रांसोबत फिरायला जातो. त्यांच्यासोबत मैत्रिचे दोन शब्द आणि जुन्या आठवणी आपण शेअर करतो.

    मैत्री जगातील सर्वात सुंदर भेटवस्तू आहेत, ज्यामुळे आपले आयुष्य आनंदी राहते तसेच आपल्या दु: ख आणि वेदनांचे साथीदार देखील असतात. पालकांनंतर जर कोणाला स्वत: चे असे वाटत असेल तर तो मित्र आहे. हा दिवस जगभरातील मैत्री आणि मित्रांचे महत्त्व दर्शविण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाला फ्रेंडशिप डे म्हणून ओळखले जाते.

    मैत्रिचे दोन शब्द आणि जुन्या आठवणी

    मैत्रीच्या नात्यामध्ये असणारी व्यक्ती ही आपल्या निवडीवर अवलंबून असलेल्या काही व्यक्तींपैकी एक असते. मैत्रिला अजून घट्ट करण्यासाठी आपण मित्रांसोबत फिरायला जातो. त्यांच्यासोबत मैत्रिचे दोन शब्द आणि जुन्या आठवणी आपण शेअर करतो. या दिवशी सर्व मित्र एकत्र येऊन ऐकमेकांना रंगीबेरंगी हातातले बँड किंवा फुलं देतात. तसेच एकत्र मिळून भोजनाचा स्वाद किंवा आनंद घेतला जातो. तसेच आठवणी कायम स्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी आपण फोटो काढतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो.

    कोरोनाच्या काळात ‘फ्रेंडशिप डे’ कसा कराल साजरा

    कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नाहीये. त्यामुळे तोंडावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि वारंवार हात धुणे, या गोष्टींचे नियम सध्या सर्वच नागरिक पाळत आहेत. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि संसर्गावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे फ्रेंडशिप डे साजरा करताना सध्याच्या मैत्रिची सर्वात मोेठी जबाबदारी म्हणजे कोरोनाच्या काळात ऐकमेकांची काळजी घेणे.

    कोरोनावर मात करण्यासाठी सर्व मित्रांनी एकत्र येऊन लढा देणे, ही या कठीण काळात प्रचंड मोेठी गोष्ट आहे. मित्रांनी मोठ्या समूहाने एकत्र न येता मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत फ्रेंडशिप डे साजरा करणे. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील खास मित्रमंडळींचा दिवस स्पेशल करण्यासाठी त्यांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॅपच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने फेंडशिप डे होय.

    सेलिब्रेशनची सुरूवात कशी झाली ?

    २०११ साली संयुक्त राष्ट्रच्या बैठकीमध्ये दोन लोकांमधील, संस्कृतीमधील, देशांमधील मैत्रीचं नातं वाढवण्यासाठी, अधिक दृढ करण्यासाठी या दिवसाच्या सेलिब्रेशनची सुरूवात झाली आहे. भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची पद्धत आहे. यंदाही १ ऑगस्ट दिवशी फ्रेंडशिप डे साजरा होईल. मात्र त्यापूर्वी तुमच्या मित्रांना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.