अशी करा परफ्युमची निवड 

ज्या प्रकारचा परफ्युम आपण वापरतो त्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाला पारखले जाते. त्यामुळे परफ्युमची निवड करताना सजग राहणे आवश्यक आहे. एक उत्तम परफ्यूम तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतो. त्यामुळे परफ्युमची निवड तुमच्या व्यक्तीमत्त्वानुसार केल्यास तुम्हाला फायद्याचे ठरेल. परफ्युमची निवड करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

परफ्यूम खरेदी करताना सर्वप्रथम आपल्या त्वचेचा विचार केला पाहिजे. प्रत्येक परफ्यूमचा वेगळा सुगंध असतो. परंतु त्वचेवर लावल्यानंतर त्याचा गंध थोडा बदलतो. त्यामुळे आपल्या त्वचेचा विचार करूनच परफ्यूमची निवड करा.
दैनंदिन वापरासाठी नेहमी हलका सुगंध असलेले परफ्यूम निवडा. तुम्ही जेव्हा विशेष कार्यक्रमात  जात असला तर  थोडा गडद सुगंधाचा परफ्यूम निवडा. वास्तविक, प्रत्येक व्यक्तीची त्वचा आणि शरीराच्या दृष्टीने परफ्यूमचा सुगंधदेखील बदलतो. त्यामुळे आपल्या पसंतीनेच परफ्यूमची निवड करा.

परफ्युम खरेदी करताना निवडक परफ्यूमचाच सुगंध घ्या. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधामुळे बऱ्याचदा वास्तविक सुगंध कळण्यास संभ्रम निर्माण होतो.  यापासून वाचण्यासाठी कमी परफ्यूमची निवड करणेच चांगले असते.  आपला परफ्यूम व्यक्तिमत्त्व सांगत असते. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाशी मेळ खाणारेच परफ्यूम वापरावेत.

स्वभावानुसार निवडा परफ्यूम
तुमचा स्वभाव चंचल आहे आणि लग्न, पार्ट्यांची शान असाल तर तुम्ही फ्लोरल आणि फ्रुटी सुगंधाची निवड करायला हवी. अशा सुगंधामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलेल. अंबर आणि वनिला सारख्या सुगंधाची निवडही योग्य ठरेल.
तुम्ही जास्त प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी कोलोंजचा वापर करणे योग्य राहील. अशा स्थितीत तुमच्या प्रवासाचा थकवा दूर करणारा परफ्यूम लावावा. लॅव्हेंडर आणि सिटरस फ्लेव्हरचा परफ्यूम उत्तम पर्याय राहील.
मल्टी टास्किंगमध्ये विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला अशा सुगंधाची गरज आहे, जो तुम्हाला दिवसभर साथ देईल. ओरिएंटल परफ्यूम तुमच्यासाठी योग्य आहे.
अनेक संशोधनांमध्ये अंतरमुखी व्यक्ती ओरिएंटल परफ्यूमकडे जास्त आकर्षित होत असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये कस्तुरी आणि वनिला फ्लेव्हर असतो.