तुमच्या घरात Cockroaches नी उच्छाद मांडलाय? हे उपाय करून पहा, ज्या ठिकाणी असतील तेथे क्षणभरही थांबणार नाहीत

झुरळांमुळे संक्रमण (infection) आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर पुढे दिलेल्या काही सोप्या उपायांचा अवलंब आपण करू शकतो.

    अनेकांना घरात झुरळांनी (Cockroaches) उच्छाद मांडल्याचे दिसून येते. आपण आपले स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा संपूर्ण घर जरी स्वच्छ ठेवले असले तरी रात्रीच्यावेळी झुरळं (How To Get Rid Of Cockroaches) आपल्या घरात हल्लाबोल करतात. रात्री कधी तरी आपण लाईट सुरू केल्या की, समोर झुरळांचा उच्छाद दिसतो. घर, बाथरूमच्या आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या मार्गात त्यांचे वास्तव्य असते. घरातील कामे संपल्यानंतर शांतता झाल्यानंतर ही झुरळं (Cockroaches) बाहेर येतात आणि अन्नाचा शोध घेतात आणि स्वयंपाकघरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या जवळ पोहोचतात.

    झुरळांमुळे संक्रमण (infection) आणि अन्नातून विषबाधेसारख्या समस्या देखील उद्भवण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही हानिकारक केमिकल न वापरता झुरळापासून सुटका करायची असेल तर काही सोपे उपाय आपण अवलंबू शकतो.

    झुरळांपासून मुक्त होण्याचे हे आहेत सोपे मार्ग

    १. बेकिंग सोडा

    झुरळांपासून मुक्त होण्यासाठी बाथरूम ड्रेन आणि किचन सिंक इत्यादीभोवती बेकिंग सोडा शिंपडा. बेकिंग सोड्याचा वास खूप तीव्र असतो, ज्यामुळे झुरळे पळून जातात आणि घरात प्रवेश करत नाहीत. तुम्ही एक कप कोमट पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा विरघळवून हे मिश्रण बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या मार्गात टाका, असे केल्याने तेथे उपस्थित असलेली झुरळे मरतील.

    २. बोरिक ॲसिड

    आपण बोरिक ॲसिडच्या मदतीने झुरळांपासून सुटका करू शकता. तुम्ही ते रात्री बाथरूमच्या नाल्यांमध्ये, स्वयंपाकघरातील सिंक इत्यादींमध्ये टाका. त्यामुळे घरातील झुरळं गायब होऊ शकतात.

    ३. पांढरे व्हिनेगर

    घरातून झुरळांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पांढरे व्हिनेगर वापरू शकता. ते वापरण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि जिथून झुरळं बाहेर पडतात, त्या ठिकाणी शिंपडा. झुरळं त्याच्या वासामुळे पळून जातील.

    ४. गरम पाणी

    जर तुमच्या घरातून बाहेर पडणारे नाले झुरळांनी भरलेले असतील तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नाल्यात उकळते पाणी टाकू शकता. आपल्याला हवे असल्यास आपण त्यात बेकिंग सोडा देखील टाकू शकतो. यामुळे साचलेली घाण देखील साफ होईल आणि झुरळे देखील मरतील.

    (Disclaimer : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. नवराष्ट्र.कॉम त्याची हमी देत नाही.)