तुमचे एखाद्यावर प्रेम आहे की क्रश असे ओळखा

बऱ्याचदा आपल्या ओळखीतल्या व्यक्ती बद्दल आपल्या मनात विशेष भावना असतात. या भावना नक्की प्रेम आहे की आणखी काही याबद्दल मनात द्वंद  असतो. मैत्रीच्या पलीकडे जर हे नाते न्यायचे असेल तर हा द्वंद दूर करणे फार आवश्यक आहे. कारण आपण ज्याला प्रेम समजतो ते कदाचित क्रशसुद्धा असू शकते.  प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळेसुद्धा बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते. पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेने पाहत असाल, तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरा लक्ष दिलं तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते.  खरं प्रेम ओळखण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

१. तुमच्या नजरेत नजर मिळवतांना

शब्दांतून किंवा शब्दांशिवाय तो जेव्हाही तुमच्याशी संवाद साधेल, तेव्हा तो तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो का, हे एकदा तरी नक्की तपासा. तो जर तुमच्याशी नजर मिळविण्याकरिता घाबरत असेल तर तुमच्या नात्याचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करायला हवा.

२. त्याचे तुमच्या बोलण्याकडे लक्ष असते का?

टाईमपास करणारे व्यक्ती अनेकदा आपल्या जोडीदाराच्या बोलण्याकडे आणि शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. तसेच जोडीदाराच्या  काही गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेऊन त्या समजून घेत नाही. मात्र, तुमच्यावर जे खरं प्रेम करतात, ते तुमच्या प्रत्येक शब्दाला लक्षपूर्वक ऐकतात आणि त्या समजूनही घेतात.

३. भांडण करा, पण प्रेमाने

अनेक नात्यांच्या तुटण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे वाद, मतभेद आणि भांडण असतात. परंतु, तेच भांडण,  तुम्ही प्रेमाने हळू आवाजातही करू शकता. यामध्ये तुमचे नातं तुटण्याची शक्यता कमी असते. तुमच्या जोडीदाराला जर तुमची काळजी असेल, तर तो तुमच्याशी कधीच मोठ्या आवाजात भांडणार नाही. मात्र, टाईमपास करणारी व्यक्ती तुमच्या चुकांवर पांघरून घालून कोणताही वाद न घालता पुढे निघून जाऊ शकतो.

४. नात्यातील संवाद

नात्याला महत्त्व देणारे व्यक्ती तुम्हाला मेसेज तर करतील, परंतु त्यांच्या मेसेजमध्ये तुमच्या नात्याशी निगडित काहीही नसेल. तुमचे क्रश तुम्हाला बोअरिंग जोक्स आणि माहिती शेअर करतील. परंतु, तुमच्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती मात्र त्याच्या जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीची आणि प्रत्येक घडामोडीची तुम्हाला माहिती देईलच.

५. तो तुमच्या मित्र-मैत्रिणींना भेटतो?

तुमचा पार्टनर त्याच्या खासगी आयुष्यात कितीही व्यस्त असेल, तरी तुमच्या जवळच्या असलेल्या मित्र-मैत्रीणींशी तो नक्कीच भेट घेईल. परंतु, एखादा जर आपल्या नात्याची पर्वा करत नसेल, तर तो तुमच्या मित्र-मैत्रिणींची कधीच भेट घेणार नाही. तसेच त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न देखील करेल.