कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलय, ‘या’ काळात स्वतःला ‘असं’ ठेवा मानसिकदृष्टया निरोगी!

पूर्णवेळ घरात राहून देखील शारीरिक व्यायाम देखील केला जात नाही जेणे करून तंदुरुस्तपणा किंवा मानसिक शांतता प्राप्त होऊ शकेल. चला काही खास टिप्स जाणून घ्या जेणेकरुन आपण स्वत⁚ ला मानसिकदृष्ट्या निरोगी बनवू शकता.

  पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढली आहे. वातावरणात झालेला बदल, वर्तमानपत्र, टीव्हीवरील बातम्या मन अस्वस्थ होतं, चिडचीड वाढू शकते. यामुळे मानसिक ताण देखील वाढू शकतो. यामुळे मनातील बहुतांश जागा नकारात्मकता घेते. यासाठी मन आनंदी, उत्साही राहण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे.

  सोशल मीडिया पासून दूर राहा-

  आपण नकारात्मक विचारापासून दूर राहू इच्छिता, तर सर्वात महत्त्वाचं सोशल मीडिया पासून दूर राहा. कारण या वर दिवसरात्र त्याच बातम्या असतात. या मुळे आपण अस्वस्थ होऊ शकता.

  एकटे राहू नका

  आपल्या कुटुंबियांसह वेळ घालवा. एकटे बसून राहू नका, या मुळे मनात नकारात्मक विचार येतात. आपला वेळ कुटुंबासह घालवा.

  ध्यान

  ध्यान आपल्याला मानसिक दृष्टया निरोगी राहण्यास मदत करतो, तर या मुळे नकारात्मक विचार देखील मनात येत नाही. जेणे करून आपण स्वतःला मानसिकदृष्टया निरोगी ठेऊ शकतो. तसेच या मुळे आपल्याला आराम देखील मिळेल. या साठी ध्यान करण्याची गरज आहे जेणे करून आपण स्वतःला या नकारात्मक विचारांपासून दूर ठेऊ शकतो.

  संगीत ऐका, डान्स करा

  असं म्हणतात की ताणतणावात संगीत हे बूस्टर म्हणून काम करतो. म्हणून संगीत ऐका. रात्री झोप येत नाही आणि वाईट विचार मनात येतात तर अशा वेळी संगीत ऐकावं. जेणे करून मन शांत होईल आणि वाईट विचार येणार नाही. जर तुम्हाला डान्स करून आनंद मिळत असेल तर तुम्हाला डान्सही करू शकता.