रोज प्या Cabbage soup, अन् एका आठवड्यात घटवा ४ किलो वजन

जे लोक हेल्थ कॉन्शिअस आहेत आणि ज्यांना आपलं वाढलेलं वजन कमी करायचं आहे. त्यांच्यासाठी कोबीचं सूप हा एक परिणामकारक उपाय ठरू शकतो. यामुळे कमी वेळेत अधिकाधिक वजन घटविण्यास मदत होते.

वजन घटविण्यासाठी लोक विविध पर्यायांचा अवलंब करतात. रोज सकाळी उठून जीमला जाण्यापासून ते डाएटच्या विविध पर्यायांचा अवलंब करत असतात. वजन घटविण्यासाठी आपल्याला आपल्या डाएटमध्ये कोणत्याही प्रकारच्या महागड्या आणि आकर्षक पर्यायांचा डाएटमध्ये समावेश करण्याची गरज नाही. आपण आपल्या किचनमध्येच उपलब्ध असलेल्या सोप्या गोष्टी खाऊनही वजन कमी करू शकता.

हो हे खरंय, वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम शरीराला डिटॉक्स करणं गरजेचं आहे. यासाठी कोबी ही एक सर्वोत्तम फळभाजी असल्याचं मानलं गेलं आहे. ही भाजी रक्तशुद्धीकरणासोबतच पोटाशी संबंधीत तक्रारी दूर करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी आपण कोबी सूपचा आपल्या डाएटमध्ये कसा समावेश करावा आणि यामुळे आपल्याला किती लवकर याचा परिणाम पाहायला मिळेल, हे जाणून घेऊयात.

कॅबेज (कोबी) सूप डाएट म्हणजे काय आणि यामुळे वजन कसं कमी होतं

हा एक शॉर्ट टर्म वेट लॉस डाएट प्लान आहे, ज्यात ७ दिवसांसाठी मोठ्या प्रमाणात कोबीचं सूप समाविष्ट केलं जातं. फक्त एक आठवड्यासाठी हा डाएट फॉलो केल्याने ४ किलोपर्यंत वजन कमी होतं, कारण हे सूप कॅलरी बॅलन्स करतं. या डाएटसोबतच तुम्ही फळे, भाज्या, स्किम मिल्‍क, इत्यादी खाद्यपदार्थांचेही सेवन  करू शकता.

कोबीचं सूप आपला मेटाबॉलिजम वेगाने वाढवून शरीरात साचलेल्या चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतं. याशिवाय कोबी फायबरसह विटामीन, खनिज आणि पोषक तत्त्वांनीयुक्त आहे, जे शरीराला डिटॉक्स करून वजन कमी करण्यास मदत करतो.

कोबीचं सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य:

१ कोबी

२ मोठे कांदे

२ हिरव्या मिरच्या

३ गाजर

१ मोठा टोमॅटो

१ जुडी कोथींबीर

३-४ मशरूम

४-५ लसूण पाकळ्या

५-६ कप पाणी,

गार्निशिंगसाठी कोथींबीर, चिमूटभर काळी मिरी

सूप तयार करण्याची रेसिपी:

सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. एक मोठं सूप बाऊल एवढं पाणी उकळून घ्या. चिरलेल्या सर्व भाज्या उकलेल्या पाण्यात टाका. हे मिश्रण सतत ढवळत राहा. त्यावर  झाकण ठेवा आणि एक उकळी घ्या. त्यानंतर मंद आचेवर थोडावेळ उकळू द्या. १५-२० मिनिटांत सूप तयार होईल. यात मीठ, कोथींबीर काळी मिरी टाकून गरम-गरम सर्व्ह करा. 

जर आपण कमीत कमी वेळेत वजन कमी करू इच्छित असाल, तर या कोबी सूपसोबत नियमित व्यायामाचीही सवय करा. या सूपसोबतच अन्य चांगल्या पदार्थांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा. नाहीतर आपल्याला अशक्तपणा जाणवेल.