orchid

झाडांमुळे घराची शोभा(ideal indoor plants) तर वाढतेच शिवाय घरातली हवा शुद्ध राहते. काही घरांमध्ये सुर्यप्रकाश पुरेसा उपलब्ध नसतो. अशा घरांमध्ये जर तुम्हाला झाडे लावायची असतील तर तुमच्यासाठी ७ प्रकारचे(7 types of plants) खास पर्याय उपलब्ध आहेत.

  घर कितीही छोटं असो किंवा कितीही मोठं असो. प्रत्येक घरामध्ये किंवा घराच्या आवारामध्ये झाडं लावणं प्रत्येकाला आवडतं. झाडांमुळे घराची शोभा(ideal indoor plants) तर वाढतेच शिवाय घरातली हवा शुद्ध राहते. काही घरांमध्ये सुर्यप्रकाश पुरेसा उपलब्ध नसतो. अशा घरांमध्ये जर तुम्हाला झाडे लावायची असतील तर तुमच्यासाठी ७ प्रकारचे(7 types of plants) खास पर्याय उपलब्ध आहेत. या झाडांमुळे तणावही कमी होतो आणि प्रदूषणही(air pollution). त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.

  ऑर्किड प्लांट (orchid)

  ऑर्किड प्लांटला फुलं येत असल्याने खोलीतील सौंदर्य वाढतं आणि हवासुद्धा शुद्ध होते. हवेतील जाईलीन आणि टोल्यून नष्ट करण्यता ऑर्किड महत्त्वाची भूमिका निभावते. हवा शुद्ध करण्यात या वनस्पतीचा मोठा हातभार आहे.

  पीस लिली (peace lily)

  हे रोपटं हवेतून ट्राईक्लेरोथीन आणि बेन्जिनला शोषून घेऊन हवा शुद्ध करतं. दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होणाऱ्यांनी आपल्या घरात हे रोप लावावं. कमी सूर्यप्रकाशामध्ये देखील हे रोपं जिवंत राहत. याला छान सुगंधही आहे.

  ग्रीन स्पायडर (green spider)

  ग्रीन स्पायडर या रोपाला कमी पाणी द्यावं लागतं. हे रोपदेखील घरातील हवा शुद्ध करते. या रोपाची पानं कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे असतात. त्यामुळे त्याला ग्रीन स्पायडर असं नाव पडलं आहे.

  वीपिंग फिग (weeping fig)

  धुळीची ऍलर्जी असेल, तर हे रोपटं लावाच. कारण ही वनस्पती हवेतील धुळीचे कण शोषून घेते. महत्त्वाची बाब म्हणजे या झाडाला पांढरी फुलं येतात.

  बांबू पाम(bamboo)
  सुर्यप्रकाश कमी असलेल्या ठिकाणी तुम्ही बांबू प्लांट लावू शकता. हवेत ट्राईक्लोरेथिलीन आणि बेन्जिन असतं. त्यांना बाजूला करुन हवा शुद्ध करण्याचं काम बांबू करतं. फर्निचरद्वारे हवेत पसरणाऱ्या या तत्वांना वेळीच स्वच्छ करणं आवश्यक असतं.

  स्नेक प्लांट (snake plant)

  तुम्हाला झाडांची काळजी घ्यायला फारसा वेळ मिळत नसेल तर स्नेक प्लांट लावा. तुम्ही घरात नसला तरी ते झाड तग धरून राहतं. त्याच्याकडे फार लक्ष द्यावे लागत नाही.पाण्याशिवाय अनेक दिवस हे रोपटे पाण्याशिवाय तर राहतेच मात्र हवा शुद्ध राखण्याचंही काम करते.

  वॉर्नक ड्रेकेना (wornac drekena)

  हे रोपं हवेतील प्रदूषण कमी करून हवा स्वच्छ, शुद्ध करण्यास मदत करतं. या रोपाला सूर्यप्रकाश लागत नाही. त्यामुळे घरी लावण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.